Virat Kohli-Anushka Sharma | KL Rahul - Suniel Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

Asia Cup 2023: सासरेबुवांनी केलं जावयाचं कौतुक, सुनिल शेट्टीची केएल राहुलला शाबासकीची थाप, अनुष्काही विराटवर खुश

India vs Pakistan: 11 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर 228 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Rahul sadolikar

India vs Pakistan: भारतीयांसाठी क्रिकेट हा अत्यंत लाडका खेळ आहे. विशेषत: जेव्हा समोर पाकिस्तानसारखा पारंपारिक प्रतिस्पर्धी असेल तेव्हा या चाहत्यांना आणखी जोर येतो. 11 सप्टेंबरला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात हेच चित्र दिसल.

भारताने पाकिस्तानवर 228 धावांनी विजय मिळवला आणि भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला.

चाहते तर कौतुक करतायतच ;पण सोबत खेळाडूंचे कुटूंबिय आणि नातेवाईकही खेळाडूंना शाबासकीची थाप देत आहेत, चला पाहुया कोणकोणत्या खेळाडूंंवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

केएल राहुल आणि विराट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सोमवारच्या आशिया कप 2023 च्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ठोकलेल्य दमदार शतकानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांचे प्रियजनही सोशल मिडीयावर त्यांचं कौतुक करत आहेत.

केएल राहुलवर त्याची शतकी खेळीसाठी सासरे सुनिल शेट्टी तर पत्नी अथिया शेट्टीने कौतुकाचा वर्षाव केला आहे तर दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्मानेही विराट कोहलीचं कौतुक करत सोशल मिडीयावर फोटो शेअर केला आहे.

अनुष्काची इन्स्टाग्राम स्टोरी

विराटच्या नाबाद 122 धावांच्या शतकी खेळीचं कौतुक करताना अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला आनंद व्यक्त केला . आशिया चषक 2023 च्या सामन्यातील विराट दाखवणारा तिच्या टीव्ही स्क्रीनचा फोटो शेअर करत तिने लिहिले,

"सुपर नॉक, सुपर गाय !!" तिने त्याच सामन्यात केएल राहुलच्या स्कोअरचे कौतुक केले आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “अभिनंदन केएल राहुल ...”

अथियाची लाडक्या नवऱ्यासाठी पोस्ट

अथियानेही इंस्टाग्राम स्टोरीजवर विराट कोहली आणि केएल राहुलचा मॅचमधील फोटो शेअर दोघांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. अथियाने लिहिले, "चॅम्पियन्स."

केएल राहुलच्या काही फोटोंसोबत त्याचं शतक पूर्ण झाल्यानंतरच्या सुंदर क्षणाची क्लिपही शेअर केली होती. तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “अगदी काळी रात्रही संपेल आणि सूर्य उगवेल… तू सर्वस्व आहेस, मी तुझ्यावर प्रेम करते..”

अथियाच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

अथियाने केलेल्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंटसचा पाऊस पाडला आहे. अथियाच्या पोस्टवर एकाने ‘क्लासिक नॉक ब्रो’ अशी कमेंट केली. एका यूजरने, "छान पुनरागमन!" अशी कमेंट केली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ म्हणतो, “Yyyyy .” अभिनेत्री वाणी कपूरने कमेंट सेक्शनमध्ये टाळ्या वाजवणाऱ्या इमोजींचा एक ग्रुप टाकला.

अभिनेत्री शिबानी दांडेकरनेही काही रेड हार्ट इमोजी टाकले. केएल राहुलनेही अथियाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, "लव्ह यू (हार्ट आणि फ्लाइंग किस इमोजी)." सुनील शेट्टीनेही अथियाच्या पोस्टवर ब्लॅक हार्ट इमोजी टाकून प्रतिक्रिया दिली.

सुनिल शेट्टीनेही केले कौतुक

सासरे सुनील शेट्टी यांनीही केएल राहुलचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर, आपल्या जावयाचे कौतुक करत कॅप्शनही केली, त्याने सामन्यातील क्रिकेटरचा फोटो कॅप्शनसह शेअर केला,

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

छ. संभाजी महाराजांनी जुवे किल्ला ताब्यात घेतला, पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडाली; मराठी सैन्य साळ नदीकाठी ठाण मांडून बसले

Morjim News: मोरजी किनारपट्टीवर भटक्या गुरांचा धुमाकूळ; वाहतुकीत अडथळा, पर्यटकांना त्रास

कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! 'मत्स्यगंधा एक्सप्रेस'मधून 50 लाखांचं सोनं, 34 हजारांची रोकड जप्त! हरियाणातील 4 जण अटकेत

SCROLL FOR NEXT