* जब वी मीट
दिग्दर्शक म्हणून इम्तियाजचा पहिला चित्रपट 'जब वी मेट' होता. हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात, करीना 'गीत' च्या भूमिकेत दिसली होती, ती फक्त माझी 'फेव्हरेट' नाही तर सगळ्यांची फेव्हरेट आहे.
* तमाशा
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा 'तमाशा' चित्रपट, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा वेगळ्या शैलीत लव्हस्टोरी प्रेकक्षांसमोर सादर केली. या चित्रपटात रणबीरने 'वेद' ही भूमिका साकारली होती. लेबल, नाव, परिणाम याचा विचार करण्याच्या प्लॅनिंगवर विश्वास नसून प्रत्येक क्षण जगण्यावर विश्वास ठेवणारा माणूस डॉनच्या रूपात आपल्याला 'वेद' भेटतो.
* 'रॉकस्टार'
इम्तियाझने संगितावर निर्माण केलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या पात्रांपैकी एक असलेल्या, 'जनार्दन जाखर' उर्फ 'जेजे' उर्फ 'जॉर्डन' चित्रपट निर्मात्याने त्यांचा पहिला ऑन-स्क्रीन रॉकस्टार दिला. या चित्रपटाने रणबीर कपूरला खऱ्या आयुष्यातील 'रॉकस्टार' बनवले, त्या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट संगीत अल्बमपैकी एक दिला. हा चित्रपट नक्की पाहाच.
हायवे
'हायवे' मध्ये आलिया भट्ट आणि रणदीप हुडा मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खुप पसंती दिली. हा चित्रपट तुम्हाला देखिल आवडेल.
'लव आज कल'
'लव आज कल' हा इम्तियाजच्या सर्वात सुंदर चित्रपटांपैकी एक आहे. 2009 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाची कथा आजही लोकांना लक्षात आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि दिपिका पदुकोण मुख्य भुमिकेत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.