IFFI 2021: 75 क्रिएटिव्ह माईन्ड्स मध्ये गोव्याचे दोन तरुण
IFFI 2021: 75 क्रिएटिव्ह माईन्ड्स मध्ये गोव्याचे दोन तरुण Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2021: 75 क्रिएटिव्ह माईन्ड्समध्ये गोव्याचे दोन तरुण

दैनिक गोमन्तक

लहानपणापासूनच मला टी.व्हीवर दिसणाऱ्या चित्रफितीचे आकर्षण होते. सिनेमा, विविध प्रकारचे कार्यक्रम, पाहायला मला आवडायचे. मोठा झालो तेव्हा करिअर नक्की कशात करायचा असा प्रश्न पडला आणि मग ठरवून टाकलं, ज्यात आवड आहे त्यातच काम करायचं. कारण काम करण्यापेक्षाही कामाचा आनंद घेत काम जगलं पाहिजे असं असं मला वाटतं.’ फातोर्डा येथील ऑल्टन कुटिन्हो सांगत होता. ‘क्रिएटिव माइण्डस @ 75 ’ या विशेष विभागात गोव्याच्या ऑल्टनची निवड झाली आहे. हा विभाग पहिल्याच वेळी सुरू झाला आहे. या पहिल्याच वर्षी ऑल्टनने आपल्या स्वत:च्या दमावर या विभागात आपले स्थान मिळविले आहे.

‘मी पणजी येथील विन्सन अकादमीमध्ये एक वर्षाचा सिनेमा निर्मितीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्या अभ्यासक्रमात तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे सिनेमाचे तंत्र मला खऱ्या अर्थाने शिकायला मिळाले. स्क्रीनवर दिसणाऱ्या सिनेमामागे पटकथा लेखन, सिनेमाची मांडणी ,एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, सिनेमासाठी निधी कशा पद्धतीने तयार करावा लागतो या सगळ्याविषयी मला येथे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. सदर अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी कोकणी आणि मराठी भाषेत तयार केलेला ‘स्थलपुराण’ या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. हा सिनेमा बर्लीन चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. त्याशिवाय ‘तो रंग’ , ‘शिवर’ यासारख्या सिनेमासाठी  आणि ‘ड्रीमर’  या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. मी स्वत:ही काही लघुपट दिग्दर्शीत केले आहेत.

...भावी फिल्ममेकर

गोव्यातच सिनेमासंबंधीचे प्राथमिक शिक्षण धाडसाने घेणारा ऑल्टन कुटिन्हो सिनेमात अत्यंत रस घेतो. आत्यंतिक कष्ट करण्याचीही तो तयारी दर्शवतो. हजारो प्रवेशिकान्मधुन अंतीम 75 त त्याची निवड झालेली आहे. गोव्याचा तो नक्कीच भावी फिल्ममेकर आहे.

‘क्रिएटिव माइण्डस @ 75’ मध्ये मला विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या सिनेमातील नवीन ट्रेंड तसेच सिनेमासंबधी अन्य गोष्टी समजून घेण्यास मदत होणार आहे. गोव्यात सिनेमे तयार करणाऱ्या व्यावसायिकांना मार्गदर्शन क्वचितच मिळते. त्यामुळे या विषयाकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहायला हवे असे मला वाटते. गोव्यात अजूनही सिनेक्षेत्र बहरलेले नाही त्यामुळे येथे करियर पण नाही. मी माझे करियर घडविण्यासाठी मुंबईत काम करण्याचा विचार करत आहे.’

-रश्‍मी नर्से जोसलकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT