Katrina Kaif Got Angry
Katrina Kaif Got Angry Dainik Gomantak
मनोरंजन

Katrina Kaif Got Angry: कॅमेरा खाली घ्या नाही तर... कॅटरिना कैफची पापाराझींना धमकी

Akshay Nirmale

Katrina Kaif Got Angry: सेलिब्रिटींच्या मागावर असलेल्या पापाराझींपासून सुटका करून घेणे अनेकदा सेलिब्रिटींना अवघड जाते. सेलिब्रिटींच्या मागोमाग एअरपोर्टपासून घराबाहेरपर्यंत या पापाराझींचा एकप्रकारे पहाराच असतो. त्यामुळे अनेक बॉलीवुड कलाकार पापाराझींवर भडकल्याच्याही घटना समोर येत असतात. असाच प्रकार अभिनेत्री कॅटरिना कैफबाबत घडला आहे. चिडलेल्या कॅटरिनाने पापाराझींना चक्क धमकीच दिली आहे.

नेहमी कूल राहणारी कॅटरिना पापाराझींवर चांगलीच भडकली. तिला स्वतःचे खासगी आयुष्य जपायला आवडते. पण तिच्या जिमबाहेर पापाराझींना पाहून कॅटरिनाचा मुडच खराब झाला. जिमबाहेर कारमधून उतरताना कॅटिरनाला पापाराझींचा गराडा पडला. ते तिचे फोटो काढू लागले. ते कॅटला अजिबात आवडले नाही.

संतापलेल्या पापाराझींवर चांगलाच जाळ काढला. चिडून कॅटरिना म्हणाली की, कॅमरा खाली करा. आम्ही येथे एक्सरसाईज करायला येतो. जर तुम्ही असे करणार असाल तर... कॅमेरा खाली करा.. आम्हालाही एक खासगी आयुष्य आहे.

कॅटरीनाचा हा नूर पाहून पापाराझींनीही लगेचच कॅमेरा खाली घेऊन कॅटरिनाची माफी मागितली. त्यानंतर कॅट जिममध्ये निघून गेली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर अनेकजण कॅटरिना गर्भवती असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

दरम्यान, कॅटरिनाचा 'फोनभूत' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. या कॉमेडी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्याही भूमिका होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT