Actress Kajol Dainik Gomantak
मनोरंजन

Kajol: 'माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता'- काजोलचं आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

Kajol: असे काही नेते आहेत ज्यांच्यामुळे देशाचा विकास योग्यरितीने होत असल्याचे तीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Kajol: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सध्या आपल्या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. ती लवकरच 'द ट्रायल' मध्ये दिसून येणार आहे. मात्र तिच्या आगामी वेबसीरीजबरोबरच एका मुलाखती दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

काजोलने केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर चौफेर टिका होऊ लागली होती. त्यानंतर तिने ट्विटरवर पोस्ट करत केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या म्हणण्याचा अर्थ चूकीचा नसून मी शिक्षणाच्या महत्वाबद्दल बोलत होते. कोणत्याही राजकीय व्यक्तीचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता किंबहुना आपल्या देशात असे काही नेते आहेत ज्यांच्यामुळे देशाचा विकास योग्यरितीने होत असल्याचे तीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारतातील बदल संथ गतीने सुरु आहे कारण लोक परंपरांमध्ये अडकलेले आहेत आणि भारतात योग्य शिक्षणाचा अभाव देखील आहे. आपल्याकडे शिक्षण नसलेले राजकीय नेते आहेत. मी इथे जे बोलत आहे ते मी बाहेर जाऊन पुन्हा सांगेन.

देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. या राजकारण्यांमध्ये असे बरेच आहेत ज्यांना योग्य दृष्टीकोन देखील नाही आणि त्यांचा असा दृष्टीकोण माझ्या मते शिक्षणाच्या अभावामुळे आहे.

दरम्यान, 'द ट्रायल' या तिच्या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये असून लवकरच ही वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. अमेरिकन कोर्टरूम ड्रामा 'द गुड वाईफ'ची ही हिंदी व्हर्जन आहे. जिशू सेनगुप्ता तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सिरीज 14 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT