23 जुलैला डिज्नी+ हॉटस्टारवर हंगामा 2 रिलीज होणार आहे. Instagram/Shilpa Shetty
मनोरंजन

Hungama 2: चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली..

परेश रावल (Paresh Rawal) आणि राजपाल यादव (Rajpal Yadav) स्टारर कॉमेडी फिल्म 'हंगामा 2' (Hungama 2) यंदा 23 जुलैला 'डिज्नी+ हॉटस्टार' (Disney+ Hotstar)वर रिलीज होणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) बऱ्याच दिवसांपासून तिचा पुढचा चित्रपट 'हंगामा 2' याबद्दल चर्चेत आहे. या चित्रपटासह ती बर्‍याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. शिल्पाच्या या चित्रपटाविषयी चाहतेही खूप उत्सुक आहेत. परेश रावल (Paresh Rawal) आणि राजपाल यादव (Rajpal Yadav) स्टारर कॉमेडी फिल्म 'हंगामा 2' (Hungama 2) यंदा 23 जुलैला 'डिज्नी+ हॉटस्टार' (Disney+ Hotstar)वर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर 'डिज्नी+ हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर शेअर केले गेले आहे आणि त्याची रिलीज डेट सांगितली गेली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्याची प्रतीक्षा संपली आहे आणि यावेळी आयकॉनिक कलाकारांसह डबल 'हंगामा' होईल. तुम्ही हसण्यासाठी तयार आहात का?"(Hungama 2 trailer will be released on July 23)

'हंगामा 2' 2003 साली आलेल्या 'हंगामा'चा सिक्वेल आहे आणि यावर्षी 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेमुळे थिएटर बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मात्यांनी मेमध्ये थेट ‘ओव्हर टॉप’ (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

'हंगामा 2' चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी म्हणजे उद्या प्रदर्शित होणार आहे. परेश रावल पुन्हा एकदा यात दिसणार आहेत आणि त्याच्यासोबत शिल्पा शेट्टी कुंद्रा, मीझान आणि प्रनिता सुभाष हे या सिनेमात सामील होणारे नवीन स्टार आहेत. यात आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लीव्हर आणि टीकू तलसानिया देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. परेश रावल व्यतिरिक्त शोमा आनंद, अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी आणि रिमी सेन पहिल्या ‘हंगामा’ मध्ये दिसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT