Hritik Roshan Jr NTR  Dainik Gomantak
मनोरंजन

War 2 Update: ऋतिक रोशन आणि Jr NTR मध्ये होणार वॉर.... स्पाय थ्रिलर युनिव्हर्समध्ये धमाकेदार प्रवेश

Rahul sadolikar

Jr. NTR in War 2: हृतिक रोशन सध्या वॉर 2 बद्दल सतत चर्चेत आहे. 2019 मध्ये यशराज बॅनरखाली रिलीज झालेला, हृतिक आणि टायगर स्टारर वॉर-2 बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

जेव्हापासून त्याचा दुसरा भाग जाहीर झाला, तेव्हापासून चाहत्यांमध्ये स्पाय थ्रिलर चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. 

अलीकडेच बातमी आली होती की वॉर 2 चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद नाही तर अयान मुखर्जी करणार आहे.आता अलीकडील रिपोर्ट्सनुसार, 'RRR' स्टार ज्युनियर NTR देखील हृतिक रोशनच्या चित्रपटात दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशराज बॅनरने उत्तरेनंतर आता साऊथच्या मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यांचा पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरला होता.

'वॉर-2'मध्ये दक्षिण सिनेमातील एक मोठे नाव असलेल्या ज्युनियर एनटीआरला कास्ट करणे प्रॉडक्शन हाऊससाठी मोठा फायदा होऊ शकतो.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, स्पाय थ्रिलर युनिव्हर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या यशराजच्या 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळू शकते.

 हा चित्रपट एक अॅक्शन अॅडव्हेंचर आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन यांच्यातील फाईट मोठ्या पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी आनंददायी ठरेल.

स्पाय थ्रिलर चित्रपट 'वॉर-2' ज्युनियर एनटीआरसोबत जवळजवळ चर्चेत आला असून या चित्रपटासाठी त्याची व्यक्तिरेखाही निश्चित करण्यात आली आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ब्रह्मास्त्रचे यश लक्षात घेऊन निर्मात्यांनी अयान मुखर्जीला चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हृतिक रोशनने वॉरमध्ये कबीरची भूमिका साकारली होती आणि त्याच्या सीक्वलमध्येही तो त्याची भूमिका पुढे चालू ठेवणार आहे.

यासोबतच सलमान खानच्या 'टायगर-3'च्या पुढची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

आदित्य चोप्राच्या यशराज प्रोडक्शनमध्ये बनवलेल्या या चित्रपटासाठी साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने सहमती दर्शवली, तर चित्रपटाची कमाई चांगली होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु त्याचवेळी यशराजला साऊथ इंडस्ट्रीतही आपले पाय रोवण्यास मदत होईल. होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT