Bollywood Hrithik Roshan
Bollywood Hrithik Roshan Dainik Gomantak
मनोरंजन

हृतिक रोशनसोबत असलेली ही 'मिस्ट्री गर्ल' कोण?

दैनिक गोमन्तक

हृतिक रोशनसोबत डिनर डेटवर एक मिस्ट्री गर्ल दिसली. तर ती मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री आहे सबा आझाद. सबा आझाद शुक्रवारी रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती, जिथे ती हृतिक रोशनसोबत डिनर डेटनंतर बाहेर पडली होती. यात रोशन तिचा हात पकडून गाडीत बसलेला दिसला आणि दोघेही सोबत गेले. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला

हृतिक रोशन आणि सबा आझादचा व्हिडिओ झाला इन्स्टाग्रामवर व्हायरल

हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि सबा आझाद यांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. या मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. आता मिडीया ने मिस्ट्री गर्लबद्दल माहिती दिली आहे, की ती दुसरीच कोणीच नाही तर अभिनेत्री सबा आझाद आहे. 2008 मध्ये रिलीज झालेल्या दिल कबड्डी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणाऱ्या आझादने यानंतर 2011 मध्ये आलेल्या 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटात काम केले.ती शेवटची फील्स लाइक इश्क या चित्रपटात दिसली होती. सबा आझाद एक अभिनेत्री आहे तसेच इमाद शाह संचालित इलेक्ट्रॉनिक संगीत बँडचा एक भाग सुध्दा आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र संगीत करत आहेत.

सोशल मीडियावर आहेत 101000 फॅन फॉलोअर्स

सबा आझाद चे सोशल मीडियावर 101000 फॉलोअर्स फॅन फॉलोअर्स आहेत ही फक्त 32 वर्षांची आहे. तसेच ती रॉकेट बॉईज या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत जिम सरभ, इस्वास्क सिंग आणि रेजिना कॅसॅंड्रा हे कलाकार सुध्दा आहेत आणि यांची यात महत्त्वाची भूमिका आहे. या दोघांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले आहे. मात्र हृतिक रोशन आणि सबा आझाद यांना एकत्र पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हृतिक रोशन आणि सुझैन खानचा घटस्फोट

हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट झाला आहे. हृतिक रोशन ला तिच्यापासून झालेली दोन मुलेही आहेत.हृतिक रोशन हा चित्रपट अभिनेता(Actor) आहे असुन त्याने त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर तो लवकरच फायटर आणि विक्रम वेद या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान तरुणीकडून वादग्रस्त पोस्ट; भाविकांची पोलिस ठाण्यावर धडक

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

CM Pramod Sawant: 'साखळीत येत्या 5 वर्षांत 25 हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय'

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT