Novel Based Web Series Dainik Gomantak
मनोरंजन

Top 5 Novel Based Web Series: पुस्तकांच्या पानांवरच्या कथा जेव्हा वेबसिरीज बनतात, कादंबरीवर आधारित या 5 सिरीज पाहाच...

ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या या वेब सिरीज प्रसिद्ध कादंबऱ्यांवर आधारित आहेत.

Rahul sadolikar

Top 5 Novel Based Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही गाजलेल्या वेब सिरीज तुम्ही पाहिल्या असतील. सिरीजमधली पात्रं त्यांतले कलाकार आणि एकुणच कथेची मांडणी या सगळ्याचा प्रेक्षक म्हणुन तुमच्यावर पडणारा प्रभाव विलक्षण असतो. असं म्हणतात कादंबरी आणि चित्रपट या दोन साहित्य प्रकारात एक महत्त्वाचा फरक असतो.

दोन्ही जरी कथेच्या स्वरुपात काही सांगत असल्या तरीही कादंबरी हा वाचकाच्या पॉईंट ऑफ व्युव्ह ने असते तर चित्रपट किंवा वेब सिरीज ही दिग्दर्शकाच्या पॉईंट ऑफ व्युव्हने असते. अलिकडे हा फरक प्रेक्षकांच्या पटकन लक्षात येऊ शकतो.

अलीकडे काही गाजलेल्या कादंबरीवर आधारित वेब सिरीजने प्रेक्षकांना एक वेगळा आनंद दिला आहे, चला पाहुया पुस्तकाच्या पानांवरुन स्क्रिनवर झळकलेल्या या कथा...

बुक टू स्क्रिन असा प्रवास केलेल्या सिरीजमध्ये 'द नाईट मॅनेजर' ते 'डियर इश्क'चा समावेश आहे. या कथा आधी पुस्तकाच्या पानांवर आल्या आणि नंतर त्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली.

चला पाहुया त्या पाच वेब सीरीज, ज्या कादंबरीवर आधारित आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवरच्या या मालिका तुम्हाला एक विलक्षण आनंद देऊ शकतात हे न क्की.

1. नाईट मॅनेजर

या मालिकेत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, शोभिता धुलिपाला असे स्टार्स आहेत. याचे दिग्दर्शन संदीप मोदी यांनी केले आहे. ही इंडियन थ्रिलर सिरीज जॉन ले कॅरे यांनी लिहिलेल्या याच नावाच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे.

2 डियर इश्क

डियर इश्क' ही Disney+Hotstar वरील प्रसिद्ध वेब सीरिज आहे, जी रविंदर सिंग यांच्या 'राईट मी अ लव्ह स्टोरी' या पुस्तकावर आधारित आहे. ही मालिका तरुण पिढीवर लक्ष केंद्रित करून आधुनिक जगातील प्रेम आणि नातेसंबंधांच्या अडचणींवर आधारित आहे. 

यात सहा जणांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. पहिल्यांदाच प्रेमात पडण्यापासून ते ब्रेकअपच्या वेदनांवर मात करण्यापर्यंत सर्व काही आहे.

3. ग्रहण

'ग्रहण' ही डिस्ने+हॉटस्टारवर प्रसारित होणारी हिंदी भाषेतील ड्रामा सिरीज आहे. ही सत्य व्यास यांच्या 'चौरासी' या कादंबरीवर आधारित आहे, या सिरीजमध्ये भारतातील 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतरचे भीषण वास्तव बघायला मिळू शकतं. 

ही एका तरुण आयपीएस अधिकाऱ्याची कथा आहे, जीला दंगलीशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका छोट्या शहरात पाठवले जाते. ती या प्रकरणामध्ये खोलवर जात असताना, ती खोल रहस्ये आणि लपलेली सत्ये उघडकीस आणते. यांमुळे तिचा विश्वास डळमळीत होतो. या शोमध्ये पवन मल्होत्रा, जो हुसैन आणि अंशुमन पुष्कर अशी स्टार कास्ट आहे.

4. एम्पायर

'एम्पायर' ही एक ऐतिहासिक ड्रामा सिरीज आहे जी केवळ Disney+ Hotstar वर पाहायला मिळू शकते. ही मालिका अॅलेक्स रदरफोर्ड यांच्या 'एम्पायर ऑफ द मुघल्स'च्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कादंबरीवर आधारित आहे, जी 16व्या आणि 17व्या शतकात भारतातील मुघल साम्राज्याच्या उदय आणि पतनाचे वर्णन करते. 

या शोमध्ये कुणाल कपूर, डिनो मोरिया आणि दृष्टी धामी यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे, जे पॉवर-पॅक परफॉर्मन्ससह कथेत जीवंतपणा आणतात.

5. द ग्रेट इंडियन मर्डर

उद्योगपती विक्की रायची त्याच्याच पार्टीत गोळ्या झाडून हत्या केली जाते, तेव्हा पाहुण्यांना मुख्य संशयित म्हणुन वेठीस धरले जाते अशी 'द ग्रेट इंडियन मर्डर' या वेब सीरिजची कथा आहे. विकास स्वरूप यांच्या 'सिक्स सस्पेक्ट्स' या सर्वाधिक विक्री झालेल्या कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे. 

'द ग्रेट इंडियन मर्डर' ही एक मनोरंजक ड्रामा सिरीज आहे जी एका शक्तिशाली व्यावसायिकाची हत्या आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या 6 संशयितांभोवती फिरते. यामध्ये हत्येमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यात असे ट्विस्ट्सही येतात की कथा अधिक गुंतागुंतीची होते. या शोमध्ये ऋचा चढ्ढा, प्रतीक गांधी, आशुतोष राणा, शशांक अरोरा आणि रघुबीर यादव यांच्यासह इतर कलाकार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT