Arnold schwarzenegger Dainik Gomantak
मनोरंजन

Arnold schwarzenegger : जेव्हा अरनॉल्ड वयाच्या 76 व्या वर्षी 48 वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत स्पॉट होतो...

अभिनेता आणि जगभरातल्या बॉडी बिल्डर्ससाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारा अरनॉल्ड सध्या एका बातमीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Rahul sadolikar

ऑरनॉल्ड अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहेच पण त्यासोबत तो एक उत्तम शरीरसौष्ठवपटू म्हणून जगभरातल्या तरुणांसाठी मार्गदर्शक आहे.

अत्यंत कठीण परिस्थितीतही त्याने मिळवलेलं यश उल्लेखनिय आणि प्रेरणादायी आहे.सध्या ऑरनॉल्ड एका बातमीमुळे चांगलाच चर्चेत आहे.

अर्नोल्डची गर्लफ्रेंड

अर्नोल्ड त्याची गर्लफ्रेंड 48 वर्षीय हीदरसोबत स्पॉट झाला आहे. यावेळी हीदर तिच्या अँटीक पिंक मिनी बॅग आणि सोन्याचे घड्याळासह दिसली, तर तिचे प्लॅटिनम लॉक एकदम ब्लो-ड्राय स्टाईलमध्ये होते.

मेल ऑक्टोबरफेस्टसाठी आलेला अर्नोल्ड खाकी पोलो टी-शर्ट आणि कॅमल जॅकेटसह डेनिम ब्रँंडच्या लूकमध्ये दिसला

अरनॉल्ड आणि हेदर 10 वर्षांपासून एकत्र आहेत. हे कपल पहिल्यांदा 2013 मध्ये स्पॉट झाले होते. दोघांना त्यानंतर कित्येकदा डेट्सवर जाताना स्पॉट केले होते.

बिअरचे मोठे ग्लास उंचावून, फेस्टीव्हलच्या उत्साही गर्दीत साजरे करताना हे कपल आनंदात दिसत होते. 

पारंपारिक पोषाखात हजेरी

पारंपारिक बव्हेरियन हेरेन लेडरहोसेन आणि एक तपकिरी कोट परिधान करून अरनॉल्डने आठवड्याच्या सुरुवातीलाच महोत्सवात हजेरी लावली होती. 

हिदरने या खास समारंभानिमित्त लांब बाही असलेल्या पांढऱ्या टॉपवर मॅजेन्टा डिरंडल ड्रेस घातला होता.

ब्रिटिश टीव्ही प्रेझेंटर अॅना रिचर्डसन यांनी अर्नॉल्डवर केलेल्या आरोपांचा उल्लेखही नोंदवला गेला. रिचर्डसनने असा दावा केला की 2000 मध्ये एका मुलाखतीदरम्यान श्वार्झनेगरने तिची छेड काढली होती आणि नंतर त्याच्यावर मानहानीचा दावा केला होता.

श्वार्झनेगरचा न्यायालयातला खटला

श्वार्झनेगरने त्याच्या वर्तनाबद्दल माफी मागितली आणि मानहानीचा खटला न्यायालयाबाहेर निकाली काढण्यात आला.

अॅनाने कारकिर्दीवर या घटनेचा नकारात्मक परिणाम झाला असला तरी, तिने सिंपली बी शेपिंग सक्सेस या YouTube मालिकेवर हजेरी लावताना तिच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण म्हणून प्रतिबिंबित केले. 

तिने उघड केले की ती दोन वर्षांपासून कामावर नाही आणि या घटनेच्या परिणामामुळे तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT