Holi Special latest and trending songs, Holi Special Song list Dainik Gomantak
मनोरंजन

होळीशी संबंधित ट्रेंडींग गाणी जी तुमच्या सेलिब्रेशनमध्ये भर घालतील

रंग बरसे भीगे चुनार वाली रंग बरसे, होली खेले रघुवीरा यासारखी गाणी वाजवली जातात तेव्हा होळीचा सण जिवंत होतो.

Priyanka Deshmukh

रंग बरसे भीगे चुनार वाली रंग बरसे, होली खेले रघुवीरा यासारखी गाणी वाजवली जातात तेव्हा होळीचा सण जिवंत होतो. होळीच्या (Holi) खास गाण्यांशिवाय या वातावरणालाही रंग चढत नाही. हा सण जेवढा रंगांशिवाय अपूर्ण आहे, तेवढाच तो गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. अगदी लेटेस्ट गाणी देखील होळीच्या सदाबहार गाण्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत कारण 80 च्या दशकातील गाणी अजूनही होळीमध्ये ट्रेंड करतात. लेटेस्ट गाण्यांनाही त्यांचे स्वतःचे फॅन फॉलोइंग असले तरी रंग बरसे चा स्वॅग तरूण असो की जेष्ठ यां सगळ्यांमध्ये दिसून येतो. (Holi Special latest and trending songs)

जाणून घ्या होळीशी संबंधित अशी काही गाणी जी तुमच्या सेलिब्रेशनमध्ये भर घालतील.

80 च्या दशकातील सदाबहार गाणी

रंग बरसे (1981) - होळी म्हटलं की पहिलं गाण ओठावर येत ते'रंग बरसे'. सिलसिला चित्रपटातील हे गाणे सर्वाधिक प्रसिद्ध आहे. अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज या गाण्याला दिला आहे. त्यामुळे बीग बींच्या नावासोबतच त्यांच्या आवाजाने हे गाणे जिवंत केले आहे.

आज ना छोडेंगे (1971) - राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्या 'कटी पतंग' चित्रपटातील हे गाणे प्रत्येक पिढीमध्ये प्रसिद्ध आहे. राजेश खन्ना यांचे हे मजेशीर गाणे आजही तरुणाई त्याच शैलीत गातेआणि नाचते.

जय-जय शिवशंकर (1974) - 'आप की कसम' चित्रपटातील हे गाणे लोकांना नाचायला लावते. या गाण्यातील राजेश खन्ना, मुमताज आणि संजीव कुमार यांची मादक शैली आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

जोगी जी धीरे धीरे (1981) - 'नदिया के पार' चित्रपटातील हे गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहे जितके त्या काळात होते.

होली आयी रे कन्हाई (1957) - ऑस्कर नामांकित चित्रपट 'मदर इंडिया' मधील 'होली आयी रे कान्हाई' या गाण्याची जादू आजही कायम आहे

अंग से अंग लगाना (1993) - या गाण्यावर स्त्री-पुरुष थिरकतात. 'डर' सारख्या थ्रिलर चित्रपटातही या गाण्याने मजा आणली होती आणि या गाण्याने आता होळीच्या उत्सवात भर पाडून मूड बनवला आहे.

ही होळीची गाणी देखील ट्रेंडमध्ये होती:

  • होली खेले रघुवीरा (2003) - बागवान

  • डू मी अ फेवर (2005) - वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम

  • बालम पिचकारी (२०१३) - ये जवानी है दिवानी

  • बद्री की दुल्हनिया (2017) - बद्री की दुल्हनिया

  • छान के मोहल्ला (2010) - अॅक्शन रिप्ले

लेटेस्ट होळी गाणी

  • खड़के ग्लासी (2019)- जबरिया जोड़ी

  • होली बिरज मा (2018)- जीनियस

  • माइंड न करियो होली है (2019)- मिलन टॉकीज

  • होली में रंगीले (2020)- एलबम: रेमो डिसूजा

  • कमरिया (2020)- एलबम: पवन सिंह

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT