Bollywood Movie Release In Manipur Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood Movie Release In Manipur : तब्बल 20 वर्षानंतर मणीपूरमध्ये रिलीज होणार हिंदी चित्रपट...

मणीपूर सध्या हिंसाचारामुळे देशभर चर्चेत असलं तरी स्वातंत्र्यदिनादिवशी एक चांगली बातमी तिथुन मिळाली आहे

Rahul sadolikar

आज देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी मणिपूरमधूनही एक आनंदाची बातमी येत आहे. मणिपूर अनेक दिवसांपासून हिंसाचार आणि वादांमुळे चर्चेत आहे. पण, आज एक चांगली बातमी आहे. तब्बल दोन दशकांनंतर येथे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल 20 वर्षांनंतर राज्यात प्रथमच हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी

हमर स्टुडंट्स असोसिएशन (HSA) ही आदिवासी विद्यार्थ्यांची संघटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या राज्यात कुकी आणि मेईतेई यांच्यात हिंसक चकमकी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, तिथे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याची बातमी सिनेप्रेमींसाठी मोठ्या आनंदापेक्षा कमी नाही.

HSA ची योजना

चुराचांदपुर च्या रेंगकाई  (लमका) येथे चित्रपटाचा शो मंगळवारी संध्याकाळी दाखवण्याची योजना HSA ने आखली आहे. HSA ने सोमवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ते देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी एक हिंदी चित्रपट सार्वजनिकपणे प्रदर्शित करतील. 

"हे आमची अवहेलना आणि दहशतवादी गट आणि प्रो-मेटी मणिपूर राज्य सरकार यांच्या विरुद्ध निषेध दर्शवण्यासाठी आहे ज्यांनी आदिवासींना दशकांपासून आपल्या ताब्यात ठेवले आहे," असे या निवेदनात म्हटले आहे. 

कुछ कुछ होता है शेवटचा चित्रपट होता

याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. HSA म्हणते की येथे जाहीरपणे प्रदर्शित झालेला शेवटचा हिंदी चित्रपट 1998 मध्ये आला होता आणि तो चित्रपट 'कुछ कुछ होता है' होता. HSA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलेल्या देशविरोधी दहशतवादी गटांपासून आमचे स्वातंत्र्य घोषित करू".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

SCROLL FOR NEXT