Hera Pheri 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Hera Pheri 3 : देवा रे देवा ! हेरा फेरी 3 चं शूटींग थांबल.. कायदेशीर प्रकरण सुटणार का?

बहुचर्चित हेरा फेरी 3 हा चित्रपट पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

Rahul sadolikar

Akshay Kumar च्या 'हेराफेरी 3' या कॉमेडी सिनेमाची एक मोठी नवी अपडेट समोर येत आहे. आता म्हणे सिनेमाविषयी एक मोठा वाद उभा राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा वाद 'हेराफेरी 3' च्या मेकिंग राइ्टस संदर्भातला आहे.

इरॉस इंटरनॅशनलने सिनेमाच्या विरोधात एक कायदेशीर नोटीस जारी केली आहे. (Akshay Kumar Hera Pheri 3 faces legal trouble know details) आता हा वाद कायदेशीर असल्यामुळे साहजिकच चित्रपट अडचणीत आला आहे.

त्याचं झालं असं की, इरॉस इंटरनॅशनलनं सिनेमाच्या निर्मात्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये दावा केला आहे की सिनेमाचे सर्व राइट्स हे अजूनही इरॉस इंटरनॅशनलजवळ आहेत.

आपल्या माहितीसाठी इथे सांगतो की याआधी देखील 'हेराफेरी 3' संदर्भात मोठा वाद रंगला होता. टीसीरिज क़डून सिनेमाला नोटीस जारी केली गेली होती

इरॉस इंटरनॅशनकडून जे नोटीस जारी केलं गेलं आहे त्यात नाडियादवाला ग्रुपनं अद्याप त्यांना 60 करोड रुपये देणं बाकी आहे.

त्यांनी लिहिलं आहे की,''नाडियादवाला ग्रुपकडून यासंदर्भात शाश्वती दिली गेली होती की जोपर्यंत हे पैसे दिले जाणार नाहीत तोपर्यंत हेराफेरी 3 चे राइट्स इरॉसकडेच राहतील''.

यामध्ये म्हटलं गेलं आहे की, ''इरॉस जवळ सिनेमाचे राइट्स आहेत . ज्यामध्ये टायटलच नाही तर सिनेमाचे डिजिटल,म्युझिक राइट्स देखील त्यांच्याजवळ आहेत.

नाडियाडवाला कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला इरॉसच्या सहमतीशिवाय सिनेमाचे राइट्स विकू शकत नाहीत यावर देखील दोन्ही ग्रुपचं एकमत झालं होतं''.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT