Prince Harry and Meghan Dainik Gomantak
मनोरंजन

Prince Harry and Meghan: ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेघन पुन्हा राजघराण्यात परतणार?

ब्रिटीश राजपुत्र आणि त्याची पत्नी अभिनेत्री मेघन हे जगप्रसिद्ध जोडपे आता मायदेशी परतणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Rahul sadolikar

Prince Harry and Meghan: सूत्रांनी दावा केला आहे की प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल केन्सिंग्टन पॅलेसमध्ये एक अपार्टमेंट भाड्याने घेण्याचा विचार करत आहेत.

प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल केन्सिंग्टन पॅलेसजवळ एक अपार्टमेंट भाड्याने घेण्यास उत्सुक आहेत, याचा अर्थ असा की त्यांना यूकेला परत जावे लागेल.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, हे जोडपे राजघराण्यासोबतचे संबंध पुन्हा जोडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

किंग चार्ल्सच्या समारंभाला उपस्थित राहणार नाहीत

या आठवड्याच्या सुरुवातीला, असे वृत्त आले होते की प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल दोघेही राजा चार्ल्स (तिसरा) च्या आमंत्रणानंतरही बालमोरल कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत.

मे महिन्यात, किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक समारंभाला फक्त प्रिन्स हॅरी उपस्थित होते, त्यानंतरच्या कार्यक्रमांमध्ये भाग न घेता ते घाईघाईने यूएसला परतले. मेघननेही समारंभ वगळुन परत जाण्याचा निर्णय घेतला.

राजवाडा भाड्याने देणार?

आता, ओके मॅगझिनच्या अहवालानुसार, प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल केन्सिंग्टन पॅलेसमधील एका लहान अपार्टमेंटमध्ये राहण्याबद्दल विचार करत आहेत; मिळालेल्या माहितीनुसार, "हॅरीला राजवाड्याचा कैदी बनायचे नाही... त्याला आणि मेघनला त्यांच्या आयुष्यात संतुलन राखायचे आहे आणि त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित आहे.

तो आणि मेघन केन्सिंग्टन पॅलेसमध्ये एक अपार्टमेंट भाड्याने देण्याची आणि ते स्वतः सुसज्ज बनवणार असल्याचा विचार करत आहेत. 

प्रिन्स हॅरीवर हल्ला...

मेघनसोबतच्या लग्नानंतर हॅरी आणि राजकुटूंबामध्ये मोठे मतभेदही निर्माण झाले होते. मेघनच्या वंशामुळे तिला राजघराण्यात स्वीकारलं जात नाही, त्यामुळे ते वंशद्वेषी असल्याची टीकाही ब्रिटनच्या राजघराण्यावर करण्यात आली होती. मे मध्ये राज्याभिषेक समारंभात, प्रिन्स हॅरीला त्याचा भाऊ प्रिन्स विल्यम्सच्या दोन रांगामागे बसवण्यात आलं होतं.

या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या त्याच्या स्‍पेअर मेमरीजमध्ये, प्रिन्स हॅरीने एक प्रसंग तपशीलवार सांगितला होता, ज्यात प्रिन्स विल्यमने मेघन मार्कलशी विवाह केल्यामुळे त्याच्यावर हल्ला केल्याचेही सांगितले होते.

हॅरी आणि मेघन सध्या युएसमध्ये

राज्याभिषेक सोहळ्यावेळी जेव्हा हॅरीने घरातील शाही सदस्य म्हणून त्याचे जीवन तपशीलवार सांगितले होते.यात हॅरीने त्याला आलेले अनुभव सांगितले होते.

मेघन आणि हॅरी यांनी जानेवारी 2020 मध्ये जाहीर केले होते की ते राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य म्हणून पद सोडतील. त्यानंतर, ते यूएसला गेले, जिथे ते आता त्यांच्या दोन मुलांसह आर्ची आणि लिलिबेटसह राहतात.

क्वीन एलिझाबेथचा मृत्यू

गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या राणी एलिझाबेथच्या अंत्यसंस्कारात हॅरी आणि मेघन यांना शेवटचे शाही कुटुंबातील इतर सदस्यांसह पाहिले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

Verna Accident: वेर्णा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात; जिवितहानी टळली

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

SCROLL FOR NEXT