harnaaz sandhu

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

'सुंदर चेहऱ्यामुळे' मिस युनिव्हर्स जिंकले म्हणणाऱ्यांना हरनाझचे चोख प्रत्युत्तर

हरनाझ यावेळी म्हणाली,''असे विजेतेपद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते. लारा दत्ताने 2000 मध्ये हा ताज जिंकला होता.'' यानंतर आता हरनाज संधूने (harnaaz sandhu) बाजी मारली आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबच्या हरनाझ संधूने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा मुकुट भारतात परत आणला. भारताने यापूर्वी 1994 मध्ये सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्तासह दोन वेळा प्रतिष्ठित मुकुट जिंकला होता. हरनाझ आता या अविश्वसनीय महिलांच्या लीगमध्ये सामील झाली आहे.

अलीकडेच हरनाझ संधूने (harnaaz sandhu) तिच्या 'सुंदर चेहऱ्यामुळे' तिला मिस युनिव्हर्स 2021 चा किताब मिळाला असे म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तर हरनाझ यावेळी म्हणाली,''असे विजेतेपद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागते. लारा दत्ताने 2000 मध्ये हा ताज जिंकला होता.'' यानंतर आता हरनाज संधूने बाजी मारली आहे.

हरनाझ पुढे म्हणाली, माझा आणि संपूर्ण देशाचा हा विजय ऑलिम्पिक जिंकण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आपण एखाद्या खेळाचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करतो, त्याचप्रमाणे सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक का करत नाही? मात्र आता लोकांची विचारसरणी बदलत आहे. मी स्टिरियोटाइप तोडत आहे याचा मला आनंद आहे.

दरम्यान, हरनाझ संधूने तिच्या या प्रवासाबद्दलही मुलाखतीदरम्यान अनुभव सांगितले. तसेच पुढे काय याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, मला बॉलिवूडमध्ये (bollywood) एन्ट्री करायची आहे.

तसेच ती पुढे म्हणाली, ''मला सामान्य अभिनेत्री व्हायचे नाही. मला एक प्रभावशाली अभिनेत्री व्हायचे आहे जी सशक्त पात्रांसाठी आणि प्रेरणादायी भूमिकांसाठी ओळखली जाते.'' हरनाझने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने छोट्या पडद्यावरही पदार्पण केले आहे. हरनाजने 'द कपिल शर्मा शो' स्टारर उपासना सिंगसोबत दोन नवीन प्रोजेक्ट साइन केले आहेत.

"माझ्या आवडीनिवडी - मॉडेलिंग आणि अभिनयाव्यतिरिक्त, मला बागकामाची खूप आवड आहे, कारण मी नेहमीच निसर्गाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर मला स्वयंपाक करायला देखील आवडतो. त्यामुळे मी एक देसी मुलीसारखी असल्याचे देखील प्रतित होते, असेही हरनाजने म्हटले.

पुढे, हरनाज म्हणाली, मला लोकांशी निगडीत राहण्यास आवडते. तसेच मला इतरांसोबत वेळ घालवायला देखील आवडते, कारण मला इतरांकडून खूप काही शिकायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT