Amitabh Bachchan  Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Birthday Amitabh Bachchan: 'या' चार गुणांमुळे अमिताभ बच्चन बनले बॉलीवूडचे महानायक

Happy Birthday Amitabh Bachchan: मात्र अमिताभ बच्चन यांनी ती किमया साधली.

दैनिक गोमन्तक

Happy Birthday Amitabh Bachchan: आपल्या दमदार अभिनयाने आणि आपल्या भारदस्त आवाजाने विविध भूमिकांमधून ज्यांनी अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे अमिताभ बच्चन होय. ज्यांना संपूर्ण बॉलीवू़ड बीग बी म्हणून ओळखते त्या अमिताभजींचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊयात खास गोष्टी, ज्या त्यांना अभिनेता आणि माणूस म्हणून वेगळे बनवतात.

१. कष्ट

अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या अभिनयावर त्यांनी बरेच काम केले आहे. विविध धाटणीचे विषय असलेले चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. चित्रपट कोणताही असो त्यामध्ये आपले १०० टक्के देणे हे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या चित्रपटातून दिसून येते.

२. बदलांचा स्विकार

एकेकाळी करिअर( Career )च्या उच्चस्थानी असलेले अनेक कलाकार चित्रपटसृष्टीतून गायब झाल्याचे दिसते. दिलीप कुमार, राजेश खन्ना यांच्यासारखे अनेक सुपरस्टार एका काळानंतर फारशी प्रगती करु शकले नाहीत. मात्र अमिताभ बच्चन यांनी ती किमया साधली. स्वत:च्या आयुष्यात त्यांनी एक महत्वाचे मूल्य स्विकारले ते म्हणजे त्यांनी बदलत्या काळानुसार बदलत्या मुल्यांचादेखील स्विकार केला. त्यामुळे आजही या चित्रपटसृष्टीत टिकून आहेत.

३. सोशल मिडिया

अमिताभ बच्चन यांचे वय पाहता सोशल मिडिया त्यांच्यासाठी खूप मोठा बदल आहे. मात्र त्यांनी त्याच्याशीदेखील ताळमेळ साधला. महत्वाचे म्हणजे सोशल मिडिया( Social Media )चा योग्य वापर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहिले.

४. अविरत काम

अमिताभ बच्चन यांची खासियत म्हणजे त्यांनी कामातून कधीही ब्रेक घेतला नाही. त्यांनी जसा मोठा पडदा गाजवला तसाच त्यांनी छोट्या पडद्यावरदेखील आपले वेगळे स्थान निर्माण केले. केबीसीच्या माध्यमातून ते अनेकांबरोबर जोडले गेले.

आपल्या ब्लॉगपासून ट्विटरवर अमिताभ आपल्या चाहत्यांना उत्तरे देत असतात. तो त्यांना त्याचे विस्तारित कुटुंब मानतो, कारण त्याला माहित आहे की अभिनेत्याच्या यशात चाहत्यांची सर्वात मोठी भूमिका असते. त्याचप्रमाणे तरुण पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याशी समन्वय राखणे हा अमिताभ यांचा आणखी एक मोठा गुण आहे.

ज्या अभिनेत्याचा अभिनय बीग बींना आवडतो त्यांना तो हाताने लिहलेले कौतुक पत्र आणि फुले पाठवतो. वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसासारख्या खास प्रसंगी आपल्या सहकारी कलाकारांना शुभेच्छा द्यायलाही तो विसरत नाही. विचार केला तर आपल्यापैकी बरेच जण आपल्या नातेवाईकांचे वाढदिवसही विसरतात. उत्कृष्ट अभिनयासोबतच या अद्वितीय गुणांमुळे अमिताभ इतरांपेक्षा वेगळा ठरतात.

वयाच्या ८१ व्या वर्षी ५० वर्षापेक्षा जास्त चित्रपटामध्ये कारकिर्द असलेल्या अमिताभ बच्चन यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या चित्रपटाचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत त्यामुळे त्यांना महानायक म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT