Amir Khan: बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे तो अभिनेता म्हणजे आमिर खान. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत होता. मात्र त्याचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता आमिर खानने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
ज्या क्षणाची आमिर खानचे चाहते वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. अभिनेत्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'सितारे जमीन पर' आहे.
आमिर खानचा नवीन चित्रपट
आमिर खानने त्याच्या पुढच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाची घोषणा केली. आमिरचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता तशाच धाटणीचा हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.
आमिर खानने आपल्या नवीन चित्रपट 'सितारे जमीन पर'ची घोषणा करताना एका मुलाखतीत खुलासा केला. हा प्रोजेक्ट 'तारे जमीन पर' याच विषयावर आधारित आहे. 58 वर्षीय आमिर खान म्हणाला, 'मी याबद्दल जाहीरपणे बोललो नाही आणि आताही मी जास्त काही सांगू शकणार नाही, पण चित्रपटाचे नाव सांगू शकतो. 'सितारे जमीन पर' असे या चित्रपटाचे नाव असल्याचे आमिर खानने म्हटले आहे.
अभिनेता पुढे त्याच्या 'तारे जमीन पर' चित्रपटाची आठवण करून देत म्हणाला, 'तुम्हाला माझा 'तारे जमीन पर' चित्रपट आठवत असेल. 'तारे जमीन पर' एक भावनिक चित्रपट होता, हा चित्रपट तुम्हाला खूप हसवेल. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल. पण थीम एकच आहे, म्हणून आम्ही हे नाव खूप विचारपूर्वक ठेवले.
यावेळी चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट असेल
आमिर खान पुढे म्हणाला, 'आपल्या सर्वांमध्ये दोष आहेत. आपल्या सर्वांमध्ये कमकुवतपणा आहे, परंतु आपल्या सर्वांमध्येही काहीतरी खास आहे, म्हणून आम्ही ही थीम पुढे नेत आहोत, परंतु त्या चित्रपटात माझी व्यक्तिरेखा इशानला चित्रपटात मदत करते, 'सितारे जमीन पर'मधील स्टार्स , ती 9 मुले, ज्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत, ते मला मदत करतील.'
दरम्यान, 'सितारे जमीन पर' हा चित्रपट वेगळा आहे कारण तो विनोदी आणि हृदयस्पर्शी आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त आमिर खान इतर अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहे. त्याचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट फ्लॉप झाला, त्यानंतर त्याने चित्रपटातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. 16 वर्षांपूर्वी 2007 मध्ये आमिर खान( AMIR KHAN) चा 'तारे जमीन पर' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आमिर त्याचा दिग्दर्शक होता आणि त्याने चित्रपटा( Movie)ची निर्मितीही केली होती. आमिर व्यतिरिक्त या चित्रपटात दर्शील सफारी, तनय छेडा, विपिन शर्मा आणि टिस्का चोप्रा सारखे कलाकार होते. दर्शीलने इशान नावाच्या स्पेशल मुलाची भूमिका साकारली होती.
त्याला लिहिण्यात आणि वाचण्यात अडचण येत होती. त्याच्या शिक्षकाने त्याला डिस्लेक्सिया असल्याचे शोधून काढले आणि त्याला या आजारावर मात करण्यास मदत केली. आता सितारे जमीन पर काय नवीन कहाणी घेऊन येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.