'Goal Goa' to be screened in open space on Morjim Beach Dainik Gomantak
मनोरंजन

मोरजी समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेत प्रदर्शित होणार 'गोल गोवा'

गोव्यात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल(football) या खेळातून या लघुपटाची कहाणी उलगडते.

दैनिक गोमन्तक

गोल गोवा (Goal Goa) या नवीन लघुपटाचा 24 ऑक्टोबर रोजी गोव्यात प्रीमियर होत आहे. मोरजीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेत प्रदर्शित होणाऱ्या या लघुपटातून या कोरोनाकाळात मोकळ्या अवकाशापासून दूर राहिलेल्या आपल्या जीवनाला ‘पुन्हा एकदा मैदान लाभू दे’ अशी अपेक्षा बाळगणारा आशय मांडण्यात आला आहे. गोव्यात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल या खेळातून या लघुपटाची कहाणी उलगडते. कथनात्मक आणि माहितीपट अशा दोन्ही शैलीचा वापर या लघुपटात झाला आहे.

या लघुपटाचे निर्माते रेमी फर्नांडिस यांचे फुटबॉलवर अतिशय प्रेम आहे. ते जरी व्यावसायिक पातळीवर स्वतः फुटबॉल खेळू शकले नसले तरी त्यांच्या आयुष्यातल्या चाळीस पैकी तीस वर्षे ते फुटबॉल खेळत आलेले आहेत. मोरजी हा त्यांचा गाव. कामाव्यतिरिक्त फुटबॉल खेळणे, समुद्रावर बागडणे, मासेमारी करणे हे त्यांचे छंद. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे त्यांना आपले सारे जीवनच थांबल्यासारखे वाटले. या मनस्थितीतून बाहेर कसे यावे हा प्रश्न त्यांना सतावत होता. या सिनेमाच्या दिग्दर्शिका लीझा हेईडलोफ या देखील गोव्यात अडकून पडल्या होत्या. लीझा या इंग्लंडच्या. जेव्हा रेमीनी लीझासमोर आपल्या मनातली अस्वस्थता व्यक्त केली, तेव्हा मोकळ्या अवकाशाची ‘आकांक्षा’ बाळगणारा एखादा लघुपट करावा असे ठरले. लिझा यांच्याकडे चित्रपट निर्मितीचा अनुभवही होता. दरम्यान युरोपमध्ये फुटबॉल खेळ सुरू झाला होता. रेमीला आता गोव्यात फुटबॉल कधी सुरू होतो याचे वेध लागले होते. फुटबॉलविना अस्वस्थ झालेल्या रेमीने ‘फुटबॉल’ हाच आपल्या लघुपटाचा विषय असेल हे ठरवले.

गेल्या भर पावसाळ्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. माहिती आणि कथा या दोन्हीचे मिश्रण असणाऱ्या या लघुपटाला तयार व्हायला दीड महिना लागला. गोव्यात फुटबॉल या खेळाची सुरुवात कधी आणि कशी झाली या टप्प्यावर सुरू होऊन या लघुपटाची रूपरेषा पुढे सरकते आणि हा लघुपट ‘मुलांना मैदानावर पुन्हा चला’ असा संदेश देतो. मुलीनीदेखील फुटबॉल खेळाच्या क्षेत्रात येणे किती आवश्यक आहे यावरही हा लघुपट भाष्य करतो. गोव्यात ज्यांनी फुटबॉल रुजवला, जोपासला आणि लोकप्रिय केला त्या अनेकांचा सहभाग या लघुपटात आहे. धेम्पो स्पोर्ट्स क्लबचे श्रीनिवास धेंपे, राष्ट्रीय फुटबॉल संघाचे तांत्रिक संचालक मेंदेरा, भारतीय महिला संघाच्या माजी प्रशिक्षिका मॅमोल रॉकी, भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि फिफा रेफ्री उवेना फर्नांडिस अशा गोमंतकीय फुटबॉल क्षेत्राशी निगडित असणाऱ्या अनेक नामवंतांचा सहभाग या लघुपटात आहे.

या लघुपटाच्या दिग्दर्शिका लिझा म्हणतात, गोव्यात फुटबॉलचा विकास कसा होईल आणि खेळाडूंना वर्ल्डकपचे स्वप्न वास्तवात साकार करणे कसे शक्य होईल याची याची चाचपणी हा लघुपट करतो. हा लघुपट दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता तर इंग्लंडमधील डीपी स्पोर्ट्स वाहिनीवरून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT