53rd IFFI Goa | Lost Movie Dainik Gomantak
मनोरंजन

53rd IFFI Goa: यामी गौतमचा 'लॉस्ट' चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर

53rd IFFI Goa: 'लॉस्ट' हा चित्रपट आता प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट (IFFI) महोत्सवात गालासाठी प्रीमियर होण्यार आहे.

दैनिक गोमन्तक

53rd IFFI Goa: गोव्यात (Goa) 20 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट इफ्फी (IFFI) महोत्सवाच्या सेलिब्रेशनला आता काही दिवसच उरले आहेत. आता इफ्फीत झी स्टुडिओज आणि नमह पिक्चर्सचा 'लॉस्ट' (Lost) हा चित्रपटही गालासाठी प्रीमियर होण्यार आहे. यामी गौतमचा 'लॉस्ट' चित्रपट शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव आणि अटलांटा इंडियन फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित, लॉस्ट हा एक सत्य घटनांवर आधारित आकर्षक थ्रिलर चित्रपट आहे. लॉस्ट हा चित्रपट एका उत्साही तरुण महिला क्राईम रिपोर्टरची कथा आहे, ज्यात एक तरुण कार्यकर्ता अचानक बेपत्ता होण्यामागील सत्य कारणाच्या शोधात आहे. कलाकारांच्या चमकदार कामगिरीचे आणि चित्रपटाच्या थ्रिलर स्टोरीचे सर्वत्र र्कौतुक केले आहे. चित्रपटात सशक्त स्त्री, स्त्रीवाद आणि पत्रकारिता असलेल्या थीमचा समावेश आहे.

या चित्रपटात (Yami Gautam) यामी गौतमसह, पंकज कपूर, राहुल खन्ना, नील भूपलम, पिया बाजपेयी आणि तुषार पांडे दिसणार आहेत. दिग्दर्शक अनिरुद्ध चौधरी म्हणाले, "मला आनंद आहे की विविध चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाला इतके उत्स्फूर्त स्वागत केले आणि आता इफ्फी सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर चित्रपटाचा भव्य प्रीमियर होण्यार असल्याचा मला सन्मान वाटतो''. यामी गौतमनेही तिच्या इंस्टाग्राम पेजवर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

तसेच, मला खात्री आहे की (IFFI) आशियाई प्रीमियर गालामध्येही असेच होईल. लॉस्ट हा नक्कीच एक अनोखा चित्रपट आहे, महोत्सवात चित्रपटाचे स्वागत आणि भारतात (India) चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. असे जी स्टूडियोजचे सीबीओ, शारिक पटेल हे म्हणाले.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT