Goa 53rd IFFI| Pankaj Tripathi
Goa 53rd IFFI| Pankaj Tripathi  inik Gomantak
मनोरंजन

Pankaj Tripathi On South Films: पंकज त्रिपाठींनी साऊथ चित्रपटांच्या ऑफर्स का नाकारल्या, इफ्फीत केला खुलासा

दैनिक गोमन्तक

Pankaj Tripathi Rejects South Indian Films: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी यांना इंडस्ट्रीत काम करून अनेक वर्षे झाली आहे. ओटीटीपासून ते बॉलीवूड चित्रपटांपर्यंत त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक वेळी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. पंकज त्रिपाठी यांनीही बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपले नाव खुप मेहनतीने कमवले आहे. आज प्रत्येक चित्रपट निर्मात्याला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. त्यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीतूनही अनेक ऑफर येत आहेत, पण पंकज त्रिपाठींना साऊथच्या चित्रपटात काम करावे असे वाटत नाही. असे त्यानी गोव्यात (Goa) सुरु असलेल्या इफ्फीत स्पष्ट केले आहे.

  • दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर का नाकारत आहेत?

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. बॉलीवूडचे सर्व कलाकार या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास तयार आहेत, तर पंकज त्रिपाठी एक दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर नाकारत आहेत. त्यानी 2003 मध्ये एका कन्नड चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली असुन सुध्दा त्यांना साउथ चित्रपटांमध्ये (Movie) काम करण्याची इच्छा नाही.

बॉलीवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी पंकज त्रिपाठी यांनी काही तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण आज त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांपध्ये काम करण्याची इच्छा नाही. पण खरं तर त्यांना दक्षिणेतच नाही तर हॉलिवूड किंवा इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे नाही. गोव्यात (Goa) सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (IFFI 53rd 2022) झालेल्या संवादादरम्यान पंकज त्रिपाठी यांनी याचे कारण सांगितले आहे.

  • हॉलिवूडचे चित्रपट करायचे नाहीत!

पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, 'माझ्यासाठी भाषा हा अडथळा नाही, पण मी हिंदी चित्रपटाला प्राधान्य देतो. कारण मला हिंदी आवडते. इतर भाषेतील चित्रपटात हिंदी भाषिक भूमिका असेल मी कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करण्यास तयार आहे. पंकज त्रिपाठीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो 'ओह माय गॉड'- 2 मध्ये दिसणार आहे. यावर्षी 'शेरदिल: द पिलीभीत सागा' शिवाय ते 'क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच'(Criminal Justice: Adhura Sach) या वेब सीरिजमध्ये दिसला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT