IFFI Goa 2022 : पाळीव कुत्र्यांबद्दल इमारतीमधील शेजाऱ्यांना असलेल्या तक्रारीमुळे संकटात सापडलेल्या एका माणसाबद्दल वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखावरून दिग्दर्शक रॉड्रीगो गुरेरो यांना सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स) हा चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज आयोजित करण्यात आलेल्या ‘टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. कधीकधी प्राणी माणसासारखे वागतात आणि माणसे पशूंसारखी वर्तणूक करतात, असं म्हणत रॉड्रीगो यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं.
सध्याच्या शहरी वातावरणात एकटेपणा आणि परस्परांतील सौहार्द यांच्या बाबतीत असलेल्या समस्या यांच्याशी निगडित संकल्पनांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या चित्रपटाद्वारे केल्याचं रॉड्रिगो यांनी म्हटलं आहे. कुत्र्यांचे एक कुटुंब मानवी नात्यांसाठी उत्प्रेरकाचे काम करतं, असं या चित्रपटाच्या कथानकातून दाखवण्यात आलं आहे.
प्राण्यांसोबत चित्रिकरण करताना उभ्या राहिलेल्या आव्हानांबाबत विचारलं असता, दिग्दर्शक रॉड्रिगो गुरेरो म्हणाले की, चित्रपटात काम करणारे प्राणी नियंत्रित वातावरणात रुळलेले असले की त्यांच्यासोबत काम करणे सोपे होते. चित्रपटातील मुख्य कलाकार आणि प्राणी यांना एकमेकांची ओळख आणि सवय व्हावी यासाठी चित्रिकरणापूर्वी आठवडाभर त्यांना एकत्रितपणे वावरण्याचा सराव करावा लागल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
2021 मध्ये तयार झालेल्या आणि 53 व्या इफ्फीमध्ये सादर झालेल्या सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स) या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. अर्जेन्टिनाच्या रॉड्रिगो गुरेरो दिग्दर्शकाचा हा चौथा चित्रपट आहे. एकूण 80 मिनिटांहून थोड्या जास्त कालावधीचा हा चित्रपट मनुष्य आणि त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा शोध घेतो. 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाच्या सुवर्णमयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपट एकमेकांशी चुरशीची स्पर्धा करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.