Goa CM Pramod Sawant likes this movie of Amitabh and Dharmendra the most Dainik Gomantak
मनोरंजन

प्रमोद सावंतही आहेत बॉलिूडच्या प्रेमात, पाहा मुख्यमंत्र्यांचा आवडता सिनेमा कोणता

गोव्यात (Goa) शनिवारपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून भारताचा 52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (52nd Internation Film Festival Of India) सुरू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) शनिवारपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून भारताचा 52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (52nd Internation Film Festival Of India) सुरू झाला आहे. चित्रपट जगतातील हा सर्वात मोठा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांना सन्मानित करण्यात येणार असून अनेक चित्रपटही दाखवले जाणार आहेत. या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा करण जोहरने (Karan Johar) होस्ट केला होता. उद्घाटन समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सीएम प्रमोद सावंत यांनी खुलासा केला की धर्मेंद्र (Dharmendra) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'शोले' (Sholay) हा त्यांचा सर्वकालीन आवडता चित्रपट आहे. एवढेच नाही तर कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांचा 'एक दुजे के लिए' (Ek Duje Ke Liye) हा चित्रपट राज्यात चित्रित झालेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीएम प्रमोद यांना गोव्याच्या या तीन गोष्टी आवडतात

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद सावंत यांच्या भाषणानंतर, कार्यक्रमाचे सूत्रधार आणि चित्रपट निर्माता करण जोहरने त्यांच्यासोबत एक रॅपिड फायर राउंड खेळला, ज्याचा प्रेक्षकांनी मनापासून आनंद घेतला. गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया यांच्यातील संबंधाबाबत विचारले असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, चित्रपट कलाकार आणि इतर सर्वजण गोव्यात महोत्सव सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

ते म्हणाले की, राज्यात गेल्या 17 वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे, परंतु यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतल्यामुळे हे विशेष आहे. या सोहळ्याबद्दल त्यांना सर्वात जास्त कशामुळे आनंद होतो? या प्रश्नाला उत्तर देताना प्रमोद सावंत म्हणाले की, कोविड-19 महामारीनंतर पहिल्यांदाच 75 सिनेतारका एकत्र एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मला वाटते की पुढील नऊ दिवसांत आणखी कलाकार गोव्यात येणार आहेत, जे आपण येथे दीर्घकाळ पाहू शकतो.

यानंतर करण जोहरने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारले की, गोव्याबद्दल त्यांच्या मते कोणत्या तीन सर्वोत्तम गोष्टी आहेत? यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, मला संपूर्ण गोवा आवडतो, पण पहिली गोष्ट मला आवडते ती म्हणजे जातीय सलोखा. गोव्याबद्दल मला आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे उच्च साक्षरता दर आणि तिसरी गोष्ट म्हणजे सूर्य, वाळू आणि समुद्र यांचा मिलाफ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT