Mithun Chakraborty Dainik Gomantak
मनोरंजन

Mithun Chakraborty: बंगालच्या छोट्या खेड्यातून आलेला गौरांग, असा झाला बॉलिवूडचा डिस्को डान्सर

दैनिक गोमन्तक

Mithun Chakraborty: बॉलीवूडचा डिस्को डान्सर म्हणून ओळखला जाणाऱ्या मिथून चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस. इंडस्ट्रीमध्ये मिथूनदा म्हणून आपली ओळख निर्माण करणारे मिथून चक्रवर्ती यांनी आज 72 वर्षे पूर्ण केली आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल खास गोष्टी.

मिथून चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांगा चक्रवर्ती असे होते. त्यांचा जन्म 16 जून 1980 ला झाला. मिथून चक्रवर्ती यांनी फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. बॉलीवूडमध्ये मिथून चक्रवर्ती यांना 'डिस्को डान्सर' आणि 'प्यार झूठा नही' या चित्रपटांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या अॅक्शन चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच मोठी पसंती मिळाली.

या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार

1976 साली प्रदर्शित झालेली म्रिगया, 1990 साली प्रदर्शित झालेला अग्नीपथ, 1992 ला बंगाली भाषेत प्रदर्शित झालेला तहदेर कथा यासाठी हे पुरस्कार मिळाले आहेत.

1998 ला स्वामी विवेकानंदा चित्रपटातील सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेता म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी डान्सर हेलेन यांचे राना रेज या नावाखाली असिस्टंट म्हणून काम केले आहे. त्यांना प्रसिद्धी मिळण्याआधी ते डान्सर म्हणून काम करत असायचे. त्यावेळी एकावेळच्या जेवणाची सोय होईल की नाही याची शंका असायची असेही मिथून चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

या अभिनेत्रीबरोबर जोडले होते नाव

मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळण्याआधी मिथून चक्रवर्ती यांनी 1976 साली अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट दो अनजाने मध्ये काम केले होते.

80 च्या दशकात त्यांचे नाव दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबर जोडले गेले होते. त्यांनी गुप्तपणे लग्न केल्याच्या चर्चाही मोठया रंगल्या होत्या. मात्र आजही त्या अफवा मानल्या जातात.

फूटबॉलला प्रोत्साहन

अभिनयाशिवाय फूटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बंगाल फूटबॉल अॅकॅडमी स्थापन केली आहे. जिम्मी झिंगचॅक हे कॉमिक बूक मिथून चक्रवर्ती यांच्यापासून प्रेरणा घेऊन लिहले आहे. याशिवाय, त्यांची तमिळनाडू, दार्जिंलिंग, सिलगुडी आणि कोलकाता मधील हॉटेल ते उत्तम व्यावसायिक असल्याचे दाखवून देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT