Gangubai Kathiawadi | Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: विदेशातही गंगुबाईची हवा, रॅम्पवॉक झाला व्हायरल

Gangubai Kathiawadi: मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्स गंगूबाईच्या गेटअपमध्ये रॅम्पवॉक करताना दिसून आल्या

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिचे फॅन्स जगभरात आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या चित्रपटाची क्रेझ देश-विदेशातही पाहायला मिळत आहे.

आलियाच्या गंगूबाईची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्स गंगूबाईच्या गेटअपमध्ये रॅम्पवॉक करताना दिसून आल्या. गंगूबाईसारखा पेहराव मॉडेल्सने केला होता. गंगूबाईसारख्या बांगड्या, टिकली, झुमके, आणि काळा चष्मा या मॉडेल्सने रॅम्पवॉक करताना लावला होता. फक्त गंगूबाईच्या साडीची जागा गाऊनने घेतली.

फॅशन शोदरम्यानचे गंगूबाईच्या लूकमध्ये मॉडेल्सचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. मिस स्टार मलेशिया 2022 ने हे फोटो (Photo) शेअर करत लिहिले,"सन्मानाने जगण्यासाठी कोणाला घाबरू नका". गंगूबाईचा इंडो-वेस्टर्न लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केली आहे. अनेक बिग बजेट चित्रपटांना 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने टक्कर दिली आहे.

  • गंगूबाई काठियावाडी चित्रपटाबद्दल अधिक माहिती

'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट (Movie) हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई'वर आधारित आहे. 1960 च्या दशकात कामाठीपुरातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक, गंगूबाई खूप लोकप्रिय आणि आदरणीय होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT