Ganpath Box Office Collection Day 1  Dainik Gomantak
मनोरंजन

Ganapath Box Office Collection: 6 व्या दिवशीही 'गणपत'ची अवस्था वाईट...कमाईचा आकडा समाधानकारक नाहीच

Rahul sadolikar

Ganapath Box Office Collection Day 6: अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमीका असलेला गणपत हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत होता. रिलीजनंतर मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही.

रिलीजनंतर 6 दिवसांत चित्रपटाला अपेक्षित कमाई करता आली नाही. चित्रपटाचे कलेक्शन पाहता हा चित्रपट प्रेक्षकांनी स्वीकारल्याचे दिसत नाही. चला पाहुया गणपतचे रिलीजपासूनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

गणपत

टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या  गणपतची बॉक्स ऑफिसवर आणखी घसरण सुरू आहे.

बुधवारी, रिलीज झाल्यापासून सहाव्या दिवशी, Sacnilk.com च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार या अॅक्शन चित्रपटाने ₹ 1.10 कोटी कमावले .आतापर्यंत एकूण ₹ 10.90 कोटींसह चित्रपटाने अखेर दुहेरी अंकी कमाई केली आहे

गणपतची कमाई

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार बुधवारी गणपतने सुमारे 9.73 टक्के हिंदी व्यवसाय नोंदवला. चित्रपटाला तिकीट खिडकीवर कमी प्रतिसाद मिळाला आणि दसऱ्याच्या सुट्टीत आणखी घसरण झाली. 

गणपतने पहिल्या दिवशी फक्त ₹ 2.5 कोटी गोळा केले आणि पहिल्या वीकेंडमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. सोमवारी ही कमाई आणखी घसरली आणि 1.3 कोटी अशी झाली.

सणासुदीच्या हंगामाचा थोडा फायदा झाला आणि ही कमाई मंगळवारी 1.5 कोटी अशी झाली.

हिरोपंतीनंतर पुन्हा एकत्र

हिरोपंती नंतर गणपत टायगर आणि क्रिती सेनॉन ऑनस्क्रीन पुन्हा एकत्र आले आहेत . या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्वीन फेम विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

तगडी स्टारकास्ट

टायगर आणि क्रितीसोबतच या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. एली अवराम, गौहर खान, रहमान, जमील खान, गिरीश कुलकर्णी, श्रुती मेनन, जियाद बकरी, जेस लियाउदिन आणि ब्राहिम चाब यांनीदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमीका साकारल्या आहेत.

गणपतची कथा

गणपथ गुड्डू उर्फ ​​टायगर श्रॉफभोवती फिरतो जो प्रत्येकाचा तारणहार, गणपत बनतो. त्याच्या काळातील कुख्यात सिंडिकेटपासून लोकांचे रक्षण करण्याच्या मोहिमेवर तो बाहेर पडला आहे.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT