Fukrey 3 Promo Dainik Gomantak
मनोरंजन

Fukrey 3 Promo: 'फुकरे 3' चा प्रोमो पहाल तर पोटधरुन हसाल

Fukrey 3 Promo: त्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

Fukrey 3 Promo: बॉलिवूडचा कॉमेडी चित्रपट 'फुकरे'चे दोन भाग तुम्ही पाहिले असतील. 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरले आहेत. आता त्याचा तिसरा भाग 'फुक्रे 3' येत आहे. जो 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यामध्ये ऋचा चढ्ढा, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, पुलकित सम्राट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २८ सप्टेंबरला हा चित्रपट रिलिज होणार असून त्याच्या 10 दिवस आधी चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा प्रोमो कॉमेडी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहे.

विपुल विज लिखित आणि मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित हा चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली फरहान एकर आणि रितेश सिधवानीसोबत पुनरागमन करत आहे. जिथे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता असली तरी अली फजल चित्रपटाचा भाग नसल्याने चाहते नाराज झाल्याचे दिसून आले आहे. ४४ सेंकदाचा हा प्रोमो प्रेक्षकांना पोटधरुन हसायला भाग पाडत आहे. या प्रोमोला मिलियनमध्ये व्हिव्यू मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सुरुवातीला ७ सप्टेंबरला हा चित्रपट रिलिज होणार होता. मात्र जवान चित्रपटाच्या रिलिजमुळे फुकरे रिलिज करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणेच फुक्रेच्या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचे प्रेम मिळणार का? बॉक्स ऑफीसवर आता हा बहुचर्चित चित्रपट हिट ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT