बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Twitter/@YUVSTRONG12
मनोरंजन

दिलीप कुमार यांचे 'हे' पाच चित्रपट आजही आहेत सर्वांच्या आवडीचे

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत 6 दशकांहून अधिक काळापासून काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत 6 दशकांहून अधिक काळापासून काम केले आहे. इंडस्ट्रीतील (Film industry) प्रत्येकजण त्यांचा मोठा चाहता आहे. त्यांनी प्रत्येक पिढीतील कलाकारांना प्रेरणा देखील दिली आहे, त्यापैकी एक म्हणजे शाहरुख खान. दिलीप कुमार यांनी ज्वार भाता (Jwaar Bhata) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी मुगल-ए-आजम, नया दौर अशा अनेक महान चित्रपटांमध्ये (films) काम केले आहे आणि बरेच पुरस्कार देखील जिंकले आहेत. दिलीप कुमार यांचे 5 सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(From Naya Daur to Ram Aur Shyam Dilip Kumars superhit films which are still everyones favorite)

मुगल-ए-आजम :

दिलीप कुमार यांचा मुगल-ए-आजम क्लासिक चित्रपट 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता होता. त्या काळात, दीड कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने कोटय़वधींचा व्यवसाय केला होता. दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. या चित्रपटाने नॅशनल ते फिल्मफेअर अवॉर्डपर्यंत अनेक शीर्षके जिंकली होती.

नया दौर :

दिलीप कुमार यांच्यासमवेत वैजयंती माला या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट मशीन आणि माणूस यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. दिलीपकुमारच्या या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली तसेच भावनिक देखील केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन बी.आर. चोप्रा यांनी केले होते.

देवदास :

दिलीप कुमार यांच्या ‘देवदास’ या चित्रपटापासून वैजयंती मालाला बॉलिवूडमध्ये मान्यता मिळाली होती. या चित्रपटाचे खूप कौतुक देखील झाले होते. हा चित्रपट बॉलिवूडसाठी एक उदाहरण ठरला होता.

राम और श्याम :

दिलीप कुमारच्या राम और श्याम या क्लासिक चित्रपटामध्ये वहीदा रहमान आणि मुमताज महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या होत्या. या चित्रपटात दिलीपकुमारने डबल रोल साकारला होता. दोन्ही पात्रं एकमेकांपेक्षा वेगळी होती आणि त्यांनी ते पात्रं उत्तम प्रकारे निभावली होते .

गंगा जमुना :

दिलीप साहेब या चित्रपटात एक अविचारी गावकराच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ते भोजपुरी बोलताना दिसले होते. यासाठी ते टिपिकल भोजपुरी शिकले होते. हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

SCROLL FOR NEXT