मनोरंजन

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याच्या मित्रांचा हात? मुसेवालाच्या वडीलांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याची 29 मे रोजी मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुसेवालाचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते. लॉरेन्स-बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या कॅनडा येथील गोल्डी ब्रार याने सिद्धूच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्धूची हत्या करणाऱ्या सहा शूटर्सपैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे, दोघांना गोळ्या घातल्या आहेत. तर, एक जण अजूनही फरार आहे. अशात मुसेवाला याचे वडील बलकौर सिंह यांनी, सिद्धू याला ठार करणारे काही शत्रू अजून आहेत, त्यांची नावे ते लवकरच जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बलकौर सिंह म्हणाले की, 'काही जण माझ्या मुलाच्या करिअरचे शत्रू बनले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीला जे लोक त्याला भेटले ते योग्य लोक नव्हते, हे त्याचे दुर्दैव होते. त्याला हे कळत नव्हते की जे आपले भाऊ असल्याचा दावा करत आहेत, ते उद्या त्याचे शत्रू होतील. मी त्यांची नावे लवकरच जाहीर करीन, वेळ येऊ द्यात. फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. कोणी काय केले हे मी लवकरच स्पष्ट करेन.'

सिद्धू मुसेवालाच्या जवळच्या लोकांनी त्याच्या गाण्यातील शब्द घेऊन सरकार आणि गुंडांना भडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यात यश मिळू न शकल्याने मूसेवालाला मारण्याचा कट रचला गेला.' असे बलकौर सिंह म्हणाले.

मागील वर्षी अकाली नेता विकी मिद्दुखेडा यांच्या हत्येचा बदला म्हणून सिद्धूची हत्या करण्यात आली. असे पोलिसांनी सांगितले होते. विक्कीच्या हत्येत सिद्धूचा मॅनेजर असलेल्या शगनप्रीत याचं नाव समोर आलं होतं. मात्र, सिद्धूच्या वडिलांनी असे सांगितले की, 'त्यांचा मुलगा एक वर्षापूर्वी शगनप्रीतच्या संपर्कात आला होता. शगनप्रीत सिद्धूसोबत फोटो काढण्यासाठी जवळ आला होता. शगनप्रीत ही सिद्धूची मॅनेजर नव्हता.' असे बलकौर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Farmer : शेतकऱ्यांनो, तंत्रज्ञानाद्वारे काजूची निगा राखा : डॉ. व्यंकटेश हुबळी

Loksabha Election 2024 : गोव्‍यात ‘इंडिया’चे सरकार आणू : आमदार वेन्झी व्‍हिएगस

Lairai Devi Jatra 2024 : लईराईदेवी जत्रा : लाखोंची उलाढाल दृष्टीपथात

Cashew Farmer : काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण बनविणार; दिव्या राणे यांची घोषणा

Postal Voting : टपाली मतदान ठरणार निर्णायक; अटीतटीच्या लढतीमुळे दक्षिण गोव्यात भाजपला होणार साह्यभूत

SCROLL FOR NEXT