Fraud case registered against both Shilpa Shetty and Raj Kundra
Fraud case registered against both Shilpa Shetty and Raj Kundra Dainik Gomantak
मनोरंजन

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा त्रास कमी होताना दिसत नाहीये. आता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्राविरुद्ध (Raj Kundra) मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने वांद्रे पोलिसांना सांगितले की, 2014 पासून शिल्पा आणि राज एका फर्मच्या माध्यमातून त्याच्यासोबत फसवणूक करत आहेत.

तक्रारीनुसार, मेसर्स एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे संचालक, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जुलै 2014 पासून नितीन बारई यांच्यासोबत फसवणूक केली आहे. बराई यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि इतर आरोपींविरुद्ध कलम 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींची मुंबई पोलीसही लवकरच चौकशी करू शकतात, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलीस त्यांच्याशी लवकरच संपर्क साधू शकतात.

काय आहे प्रकरण

आपल्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्यातील कोरेगाव परिसरात स्पा आणि जिम उघडल्यास खूप फायदा होईल, असे आपल्याला सांगण्यात आल्याचे बारई यांनी पोलिसांना सांगितले. यानंतर बारई यांना 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपये गुंतवायला लावले, त्यानंतर आरोपींनी बारईचे पैसे आपल्या फायद्यासाठी वापरले आणि पैसे परत मागितले असता त्यांना धमकावण्यात आले.

अश्‍लील चित्रपटांशी संबंधित प्रकरणातील आरोपी राज कुंद्रा जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हिमाचलमध्ये शिल्पा शेट्टीसोबत दिसला होता. राजने येथे माध्यमांशी संवाद साधला नाही. यानंतर राज कुंद्राही वांद्रे येथील एका खेळण्यांच्या दुकानाबाहेर दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघेही धर्मशाळेतील बगलामुखी मंदिरात गेले होते आणि तेथे त्यांनी तांत्रिक पूजा केली.

मंदिरातून दोघांचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही तांत्रिक पूजा शत्रूंचा नाश आणि दुःख दूर करण्यासाठी केली जाते. राज-शिल्पाचा हवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बगलामुखी मंदिरात जाण्यापूर्वी राज शिल्पाने कांगडा येथील मंदिरामध्ये दर्शन घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT