IFFI आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना महोत्सव ‘ऑनलाईन’ (Online) पाहावा लागणार आहे.  Dainik Gomantak
मनोरंजन

आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी इफ्फी ‘ऑनलाईन’च

चित्रपट महोत्सवासाठी देशातून 500 पेक्षा जास्त पाहुणे हजर राहतील, अशी अपेक्षा आहे. तर आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची संख्या 80 पेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Iffi) तयारीला वेग आला असून ईएसजी (ESG) आणि महोत्सव संचालनालयाकडून पाहुण्यांची यादी बनवली जात आहे. मात्र, कोरोनामुळे यादी बनवताना अडथळे येत असल्याने आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना महोत्सव ‘ऑनलाईन’ (Online) पाहावा लागणार आहे. फेस्टिव्हल संचालनालयाने आज डेब्यू फिल्मसाठी 9 चित्रपटांची यादी जाहीर केली. परिसर सजावटीच्या तयारीला वेग आला असून कलाकार रात्रंदिवस कामात व्यस्त आहेत. रंगकामासंदर्भातील निविदेचा घोळ अद्यापही सुरू असल्याने रंगकाम थांबवण्यात आले आहे.

गोवन विभागात दोनच चित्रपट

गोव्यात चित्रपट महोत्सव स्थिरावल्याने स्थानिक चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राज्यातील चित्रपटांचा वेगळा विभाग सुरू केला आहे. यंदा या विभागासाठी कोकणी, मराठी आणि इंग्रजी चित्रपट मागविले असता, आतापर्यंत एक फिचर फिल्म आणि एक नॉन फिचर फिल्म आली आहे. यातील एका चित्रपटाला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे सबटायटल्स नाहीत. याबाबतचा निर्णय परीक्षण मंडळ घेणार आहे, अशी माहिती ईएसजीच्या वतीने देण्यात आली.

पदार्पण स्पर्धेत मराठी, कन्नड चित्रपट

आंतरराष्ट्रीय पदार्पण स्पर्धेसाठी निवडलेल्या चित्रपटांची यादी आज जाहीर करण्यात आली. नवोदित चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही विशेष स्पर्धा होते. यात देशातील 2 चित्रपटांची निवड झाली आहे. यात 1 मराठी आणि 1 कन्नड चित्रपटही आहे.

80 हून अधिक आंतरराष्ट्रीय पाहुणे

चित्रपट महोत्सवासाठी देशातून 500 पेक्षा जास्त पाहुणे हजर राहतील, अशी अपेक्षा आहे. तर आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची संख्या 80 पेक्षा जास्त आहे. मात्र, या पाहुण्यांसाठी कडक निकष असल्याने ज्यांच्या लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत, त्यांनाच महोत्सवासाठी बोलविले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची संख्या कमी होण्याची शक्यता चित्रपट संचालनालयाने व्यक्त केली आहे.

१. फ्युनरल

दिग्दर्शक : विवेक राजेंद्र दुबे

भारत - मराठी

२. डोल्लू

दिग्दर्शक : सागर पुराणिक

भारत - कन्नड

३. मागोडो

दिग्दर्शक: रुबेन सेन्झ

स्पेन

४. मामन

दिग्दर्शन : आरश अनिसी

इराण

५. पॅक ऑफ शीप

दिग्दर्शक: दिमित्रीस कानेलोपौलोस

ग्रीस

६. रेन

दिग्दर्शक: जानो जर्गेन्स

एस्टोनिया

७. स्वीट डिझास्टर

दिग्दर्शक: लॉरा लेहमस

जर्मनी

८. द वेल्थ ऑफ द वर्ल्ड

दिग्दर्शक: सायमन फॅरिओल

चिली

९. झाहोरी

दिग्दर्शक: मारी अलेसेंद्रिनी

स्वीत्झर्लंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: 2047 च्या पाण्याची गरज डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणार; मंत्री शिरोडकर

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

SCROLL FOR NEXT