Upendra Rao Controversial Statement Dainik Gomantak
मनोरंजन

Upendra Rao Controversial Statement: दलित समाजाबद्दल तो नेमकं काय बोलला? साऊथच्या या अभिनेत्याविरुद्ध FIR दाखल

साऊथच्या अभिनेत्याने लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दरम्यान दलित समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे.

Rahul sadolikar

सध्या साऊथच्या एका अभिनेत्याला कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागणार आहे. एका समाजाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप अभिनेत्यावर केला जातोय.

दक्षिणेतील अभिनेता उपेंद्र याच्याविरोधात कर्नाटकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान त्याने दलित समाजासाठी आक्षेपार्ह भाषा वापरली. 

या व्हिडीओमुळे बराच गदारोळ झाला. यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीटही केला आहे ;पण यामुळे या अभिनेत्याला मात्र मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे.

अभिनेता सोशल मिडीयावर काय बोलला?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल कन्नड अभिनेता उपेंद्र याच्याविरुद्ध कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपेंद्र उत्तम हे प्रजाकिया पक्षाचे संस्थापक आहेत. 

बेंगळुरूमधील सीके अचुकट्टू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलसूरू गेट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, नंतर अभिनेत्याने माफीही मागितली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल जाणून घेऊया.

व्हिडीओ व्हायरल झाला

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड अभिनेता उपेंद्र याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दलित समाजासाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर सर्वांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दलित संघटनांकडून निषेध

हा व्हिडीओ वादग्रस्त होत आहे हे समजताच उपेंद्रने हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केला. या व्हिडिओमध्ये ते उत्तम प्रजाकिया पार्टीबद्दल बोलत होते. यावेळी त्यांनी दलित समाजाबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या वक्तव्यानंतर दलित समर्थक संघटनांनी निषेध केला.

उपेंद्र राजकारणी आणि कलाकार

उपेंद्र यांचे पूर्ण नाव उपेंद्र राव आहे. अभिनेता असण्यासोबतच तो चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि राजकारणी देखील आहे. तो मुख्यतः कन्नड चित्रपटांमध्ये काम करतो. उपेंद्रने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT