Bollywood producers move to high court against Republic TV and Times now
Bollywood producers move to high court against Republic TV and Times now 
मनोरंजन

बॉलिवूडची बदनामी थांबवा; चित्रपट निर्मात्यांनी दाखल केली याचिका

गोमन्तक वृत्तसेवा

दिल्ली- रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांविरूद्ध बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. चित्रपट निर्मात्यांनी या दोन्ही वाहिन्यांना चित्रपटसृष्टीबाबत बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पणी प्रसारित करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. बॉलिवूडच्या चार संघटना आणि न्यायालयात पोहोचलेल्या ३४ चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट उद्योगाशी संबंधित होणाऱ्या मीडिया ट्रायलवर बंदी घालण्याची मागणी केली.

न्यायालयात जाणाऱ्या बड्या निर्मात्यांमध्ये अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर आणि रोहित शेट्टी या दिग्गजांच्या प्रॉडक्शन हाऊसची नावे आहेत फिल्म असोसिएशनमध्ये द प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया, द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन, द फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर कौन्सिल आणि स्क्रीन राइटर्स असोसिएशनचाही समावेश आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी, रिपोर्टर प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर, गट संपादक नविका कुमार यांनी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडविरूद्ध अपमानास्पद आणि निराधार भाष्य केले होते, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. यावर बंदी घालण्याची निर्मात्यांनी मागणी केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT