Ajay Devgan in Bhuj: The Pride of India Twitter/@FarazAn03488273
मनोरंजन

अजय देवगनच्या 'भुज: प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटाचा टीझर आउट

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj: The Pride of India) चे टीझर (teaser) आऊट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj: The Pride of India) चे टीझर (teaser) आऊट झाले आहे. नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टीझर शेअर केला आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर लोक इतके प्रभावित झाले की, त्याचा ट्रेलर लवकरात लवकर बघायचा आहे. टीझर शेअर करताना नोराने सांगितले आहे की उद्या म्हणजे 12 जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) आऊट होणार आहे. हा चित्रपट 13 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होईल.(Film Bhuj The Pride of Indias teaser out)

अजय देवगणच्या दमदार डायलॉगने जिंकली चाहत्यांची मने

चित्रपटाचा टीझर आऊट होऊन काही वेळचं झाला आहे आणि काही वेळात तो प्रचंड व्हयरल झाला आहे. टीझरमध्ये अजय देवगणचा दमदार आवाज झळकत आहे. अजय देवगनने ज्या पद्धतीने डायलॉग बोलला आहे, ते चाहत्यांना खूपच आवडले आहे. टीझरमध्ये नोरा फतेही, संजय दत्त (Sanjay Dutt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अजय देवगन (Ajay Devgan) दिसत आहेत. हे चारही जण आपापल्या पात्रांमध्ये छान दिसत आहेत. चित्रपटाचा टीझर पाहून अंदाज बांधता येतो की हा चित्रपट सुपरहिट होणार आहे. टीझरवर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

अभिषेक दुधय्या (Abhishek Dudhaiya) दिग्दर्शित खऱ्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कहाणी चित्रपटात दाखविली जाणार आहे. नुकताच अभिषेक बच्चन सोबत 'द बिग बुल' (The Big Bull) मध्ये अजय देवगन दिसला होता, त्यामध्ये त्यांच्या कामाचे लोकांकडून खूप कौतुक झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT