Ganesh Acharya Dainik Gomantak
मनोरंजन

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यविरुद्ध महिलेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बॉलीवूडमध्ये कायमच आपल्या हटके स्टाईलमुळे गणेश आचार्य लोकप्रिय राहिला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्यवर (Bollywood Choreographer Ganesh Acharya) 2020 मध्ये एका को-डांसरचा लैंगिक छळ, पाठलाग आणि गुप्तहेरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारीची चौकशी करणारे ओशिवरा पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी सांगितले की, अंधेरी येथील संबंधित महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे. कलम 354-ए, 354-सी, 354-डी, 509, 323, 504 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 506 आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये गणेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने त्याच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. (Ganesh Acharya News)

गणेश आचार्यने फेटाळून लावले आरोप

गणेश आचार्यने सहकर्मचाऱ्यांनी केलेले लैंगिक छळाचे आरोप यापूर्वी फेटाळून लावले होते. या आरोपाना खोटे आणि नाराधार असल्याचे त्याने सांगितले होते. त्याचे वकील रवी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपपत्राबाबत आपल्याला माहिती दिली नाही. माझ्याकडे आरोपपत्र नाही त्यामुळे मी काही सांगू शकत नाही, मात्र एफआयआरमधील सर्व कलमे जामीनपात्र आहेत.

तक्रारीत असिस्टंट कोरिओग्राफरने आरोप केला आहे की, गणेश आचार्यने लैंगिक संबंध नाकारल्यानंतर तिचा छळ केला. त्याने तिच्यावर अश्लील कमेंट करणे, तिला अश्लील चित्रपट दाखवणे आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

महिला डान्सरने केला गंभीर आरोप

2020 मध्ये एका बैठकीत तिने आचार्य यांच्या कृतीचा निषेध केला तेव्हा नृत्यदिग्दर्शकाने तिच्यावर गैरवर्तन केले आणि तिच्या सहाय्यकांनी तिच्यावर हल्ला केला. महिलेने सांगितले की, काही महिला सहाय्यकांनी तिला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि बदनामी केली, त्यानंतर ती पोलिसांकडे गेली. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला. मग हे प्रकरण पुढे नेण्यासाठी मी वकिलाशी संपर्क साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

SCROLL FOR NEXT