Hrithik Roshan Upcoming Film Fighter  Dainik Gomantak
मनोरंजन

Fighter Trailer: फायटरचा ट्रेलर पाहून प्रेक्षक म्हणाले हा चित्रपट घरच्यांसोबत पाहणे...

Fighter Trailer: हा सर्वात मोठा एरिअल अॅक्शन चित्रपट असणार आहे.

दैनिक गोमन्तक

Fighter Trailer: हृतिक रोशन आणि दीपीका पदुकोन यांचा फायटर या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता आहे. आता फायटर चा ट्रेलर रिलिज झाला आहे. हा सर्वात मोठा एरिअल अॅक्शन चित्रपट असणार आहे.

सिद्धार्थ आनंद पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार आहे. १५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यापासून देशाला वाचवण्याची आणि दहशतवाद्यांना मारण्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यावेळी हृतिक रोशन आकाशात राहून शत्रूंवर हल्ला करेल. तर दीपिका आणि अनिल जमिनीवर राहून त्याला अपडेट्स देत राहतील.

ट्रेलरमध्ये या मैत्री, धैर्य आणि त्यागाचे सुंदर मिश्रण दाखवले आहे. दहशतवाद, भारतीय सैनिकांचे शहीद होणे, वायूसेनेचे प्रयत्न अशा अनेक सीनमुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, 'फायटर' हा चित्रपट सर्व पिढ्यांनी पाहिला पाहिजे असे अनेकजण मत व्यक्त केले आहे.

आज रिलीज झालेला ट्रेलर एक जबरदस्त व्हिज्युअल ट्रीट असल्याचे असल्याचे सोशल मिडियावर म्हटले जात आहे. ज्यात अशी दृश्ये आहेत ज्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यास उत्सुकता दाखवतील. 3D आणि 3D IMAX मधील नेत्रदीपक व्हिज्युअल इफेक्ट्सने परिपूर्ण, 'फाइटर' प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाची हमी देतो. 25 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी विशेषत: भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT