Femina Miss India 2023 Winners: ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन, प्रियांका चोप्रा, दिया मिर्झा, नेहा धुपिया... यादी मोठी आहे. जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही कशाबद्दल बोलत आहोत, तर आज आम्ही तुम्हाला या बॉलिवूड अभिनेत्री ज्यांचा प्रवास मिस इंडिया ब्यूटी स्पर्धेच्या माध्यमातून सुरु झाला, ज्यांनी पहिल्यांदा आपल्या सौंदर्याने आणि नंतर आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले!
आज आम्ही त्यांच्याबद्दल सांगत आहोत, कारण काल रात्री मिस इंडियाच्या या वर्षीच्या आवृत्तीचा फिनाले आयोजित करण्यात आला होता.
ज्यामध्ये 2023 मध्ये मिस इंडियाचा हा प्रतिष्ठित मुकुट कोणाला मिळाला आहे, याची घोषणा करण्यात आली. फेमिना मिस इंडिया 2023 च्या तीन विजेत्यांवर एक नजर टाकूया...
तुमच्या माहितीसाठी, 15 एप्रिल 2023 च्या रात्री फेमिना मिस इंडिया 2023 चा फिनाले मुंबईत नाही तर मणिपूरच्या (Manipur) इंफाळ शहरातील खुमन लम्पक इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. या मिस इंडियाच्या मुकुटासाठी 30 राज्य विजेते लढले आणि अनेक फेऱ्यांनंतर ज्युरींच्या निर्णयानुसार विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स 2002 आणि मेंटॉर नेहा धुपिया, बॉक्सिंग स्टार लैश्राम सरिता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स लुईस, लेखक-चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि डिझाइनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा हे यावर्षीचे ज्युरी सदस्य होते.
राजस्थानच्या (Rajasthan) नंदिनी गुप्ता हिला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 (Femina Miss India World 2023 Nandini Gupta) चा मुकुट घातला.
फर्स्ट रनर्स अप (Femina Miss India 2023 First Runners Up) दिल्लीची श्रेया पुंजा (Shreya Poonja) आणि मणिपूरची स्ट्रेला लुवांग (Thounaojam Strela Luwang) या वर्षीची दुसरी रनर अप (Femina Miss India 2023 Second Runners Up) आहे. या विशेष संध्याकाळचे आयोजन मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी केले होते आणि त्यात अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन यांचे लाईव्ह परफॉर्मन्स देखील होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.