'Farzi' 2 Dainik Gomantak
मनोरंजन

'Farzi' चा सिक्वेल लवकरच येणार? 'शाहिद कपूर'ने केली घोषणा

अभिनेता शाहिद कपूरच्या बहुचर्चित 'फर्जी'चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Rahul sadolikar

farzi's sequel will coming soon : अभिनेता शाहिद कपूरच्या फर्जीचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद बघता आता या दुसरा भाग बनवला जाणार आहे.

'फर्जी' ही वेब सीरिज फर्जी नुकतीच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. या मालिकेत शाहिद सोबत विजय सेतुपतीही दिसला होता. शाहिद कपूरने फर्जी मधून ओटीटी पदार्पण केले आहे. 

ही मालिका राज आणि डीकेच्या सर्वोत्कृष्ट मालिकांच्या यादीत सामील झाली आहे. चाहत्यांना पहिली मालिका आवडली आहे आणि ते तिच्या सीझन 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता निर्माते 'फर्जी'चा दुसरा भाग आणण्याच्या तयारीत आहेत आणि खुद्द शाहिद कपूरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अलीकडेच शाहिद कपूर एका कार्यक्रमात उपस्थित होता जिथे त्याने फर्जीच्या सीझन 2 ची पुष्टी केली. याबद्दल शाहिद कपूर म्हणाला, "हो फर्जीचा सीझन 2 नक्कीच येईल पण गोष्टींना वेळ लागतो. कारण शो संपल्यानंतर त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनला एक वर्षाचा कालावधी लागतो.

 ते 35-40 भाषांमध्ये आणि 200 देशांमध्ये रिलीज करतात. जेव्हा शूटिंग होईल तेव्हा एक वर्षानंतर मालिका प्रदर्शित होईल. त्यामुळे मला वाटते की फर्जीचा दुसरा सीझन यायला दीड ते दोन वर्षे लागतील". 

विजय सेतुपती व्यतिरिक्त, शाहिद कपूरच्या फर्जी मालिकेत केके मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, अमोल पालेकर आणि इतर कलाकार आहेत. ही मालिका 8 भागांची आहे आणि प्रत्येक भाग अंदाजे एक तासाचा आहे.

 हे राज आणि डीके या जोडीने दिग्दर्शित केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'द फॅमिली मॅन' मालिका दिग्दर्शित केली आहे. ज्यांनी फॅमिली मॅन पाहिली आहे त्यांना डीकेच्या दिग्दर्शनाची आणि स्टोरीटेलींगची स्टाईल आवडली असेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT