Actress Dainik Gomantak
मनोरंजन

Farhan Akhtar Upcoming Movie: 'जी ले जरा, राजस्थान' फरहान अख्तरची पोस्ट चर्चेत

Farhan Akhtar Upcoming Movie: दिग्गज अभिनेत्री आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Farhan Akhtar Upcoming Movie: दिल चाहता है आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटानंतर आणखी एका रोड ट्रीप असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित जी ले जरा हा चित्रपट आता चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.

या चित्रपटात आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि कॅटरीना कैफ या दिग्गज अभिनेत्री आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहेत.

फरहान अख्तर आता अभिनयानंतर दिग्दर्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा खूप आधीच झाली असली तरीही आत्ता जी ले जरा बद्दल एक अपडेट समोर येत आहे. चित्रपटासाठी लोकेशन शोधले जात असल्याची माहिती एका फोटोमधून दिली आहे.

या फोटोमध्ये राजस्थानच्या वाळवंटात फरहान अख्तर दिसून येत आहे. अभिनेत्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, सर्चिंग फॉर गोल्ड. लोकेशन की तलाश, जी ले जरा, राजस्थान. त्याच्या या पोस्टवर प्रोड्युसर रितेश सिधवानीने म्हटले आहे की, आणि तो निर्देशकच्या खुर्चीवर परत आला आहे. याबरोबरच, आलिया भटने आता वाट बघू शकत नाही अशी कंमेट केली आहे.

दरम्यान, झोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांनी लिहलेली कथेवर चित्रपटनिर्मिती होणार असून फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. फरहानच्या आधीच्या उत्तम चित्रपटांमुळे या दिग्दज अभिनय करणाऱ्या अभिनेत्री असल्यामुळे या जी ले जरा ची उत्सुकता वाढली आहे.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT