Farhan Akhtar on Don 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Farhan Akhtar on Don 3: कियारा अडवाणी बनणार डॉनची हिरॉईन? फरहान अख्तर शेवटी बोललाच...

दिग्दर्शक फरहान अख्तरने डॉन चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी मिडीयाशी शेअर केल्या आहेत.

Rahul sadolikar

Don 3 : फरहान अख्तरने डॉन 3 च्या लीड अॅक्ट्रेसवर मौन तोडले दिग्दर्शक फरहान अख्तरचा आगामी चित्रपट डॉन 3 चा टीझर नुकताच रिलीज झाला. यासोबतच चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याचे नावही समोर आले आहे. डॉन ३ मध्ये रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारत आहे. त्याचवेळी या चित्रपटातील अभिनेत्री कोण असणार यावरही चर्चा सुरू आहे.

सस्पेन्स बाकी आहे

फरहान अख्तरने डॉन 3 च्या मुख्य अभिनेत्रीवर मौन तोडले: फरहान अख्तरचा चित्रपट डॉन 3 चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर त्याने 24 तासांत टीझर रिलीज करून खळबळ उडवून दिली. यासोबतच, डॉनच्या पुढच्या फ्रँचायझीमध्ये रणवीर सिंग मुख्य नायक असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, चित्रपटाच्या अभिनेत्रीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

कियाराची चर्चा

डॉन ३ च्या अभिनेत्रीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही , मात्र अफवांचा बाजार चांगलाच तापला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार डॉन 3 साठी कियारा अडवाणीला अप्रोच करण्यात आले आहे. आता दिग्दर्शक फरहान अख्तरने चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबाबत मौन सोडले आहे.

फरहान अभिनेत्रीबद्दल म्हणाला

फरहान अख्तरने अलीकडेच बीबीसी एशियन नेटवर्कशी संवाद साधला. तिथे फरहानला डॉन 3 मध्ये रणवीर सिंग सोबत दिसणारी अभिनेत्री कोण? हे विचारलं गेलं . या प्रश्नाचे उत्तर देताना फरहानने सांगितले की, या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे आणि हे काम पूर्ण होताच तो स्वत: या अभिनेत्रीचे नाव उघड करेल.

फरहान म्हणाला

फरहान अख्तर म्हणाला, "चित्रपटाचं काम सुरू आहे. मला स्वतःहून पुढे जाऊन असे काही बोलायचे नाही जे मला नंतर काही कारणाने मागे घ्यावे लागेल, परंतु जेव्हा जेव्हा चित्रपटाची अभिनेत्री फायनल होईल तेव्हा तुम्हाला कळेल. ."

रणवीर करणार डॉनची भूमीका

डॉन 3 चा टीझर रिलीज करण्याबाबत बोलताना फरहान म्हणाला, "आम्ही नुकतीच एक घोषणा केली कारण मला वाटते की रणवीरसाठी तो डॉनची भूमिका करत आहे हे जगाला सांगण्याचा हा एक चांगला क्षण आहे.

लोकांना देखील हळूहळू समजेल की आम्ही काय करतोय?., त्यामुळे आम्हाला या सगळ्यासाठी थोडा वेळ हवा आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

SCROLL FOR NEXT