Farah Khan Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Farah Khan: मनिष मल्होत्राच्या पार्टीचे फराह खानने केले रहस्य उघड

Farah Khan: या वर्षीही मनीष मल्होत्राने आलिशान दिवाळी पार्टी दिली, ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूड जमले होते.

दैनिक गोमन्तक

Farah Khan: बॉलीवूडचे सितारे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे फक्त चित्रपटच नाही तर त्यांचे वक्तव्य, सोशल मिडियावरील पोस्ट आणि त्यांची फॅशनसुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो.

आता फराह खानने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत कलाकरांनी घातलेल्या कपड्यांविषयी मोठा खुलासा केला आहे.मनीष मल्होत्रा ​​दरवर्षी ग्रँड लेव्हल दिवाळी पार्टी आयोजित करण्यासाठी ओळखला जातो.

चित्रपट सेलिब्रिटी त्याच्या पार्ट्यांना पूर्ण स्टाईलमध्ये आणि वेगवेगळे पोशाख परिधान करून हजेरी लावतात. या वर्षीही मनीष मल्होत्राने आलिशान दिवाळी पार्टी दिली, ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूड जमले होते. फराह खानने आता मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी आणि सेलिब्रिटींच्या कपड्यांबाबत खुलासा केला आहे. फराहने सांगितले की, मनीष त्याच्या दिवाळी पार्टीसाठी सर्व सेलिब्रिटींना स्वतःचे डिझाइन केलेले कपडे देतो. दुसऱ्या दिवशी सेलेब्स त्यांचे कपडे मनीष मल्होत्राला परत करतात.

भारती सिंगसोबत तिच्या शोमध्ये बोलत असताना फराह खानने सांगितले की, मनीष मल्होत्रा ​​आपल्या पार्ट्यांमध्ये सेलेब्सना स्वतःचे कपडे देण्यास कोणतीही कसर सोडत नाही. तिने भारतीला सांगितले की, 'मनीषने त्याचे कपडे त्याच्या पार्टीतील सर्वांना दिले होते. पण आम्ही ते दुसऱ्या दिवशी परत केले. हे जाणून भारती आणि हर्ष लिंबाचिया यांना आश्चर्य वाटले.

फराहने पुढे सांगितले की, सर्वजण मनीषला विचारतात की ते त्यांच्या पार्टीला येणार आहे, तर तो त्यांच्यासाठी कपड्यांची व्यवस्था करू शकतो का? फराह म्हणाली की मनीष मल्होत्रासाठी देखील हे चांगले आहे, कारण लोक नंतर त्याने डिझाइन केलेले कपडे पाहू शकतात. हे ए-लिस्टर्ससह फॅशन शोसारखे आहे, जेथे सेलिब्रिटी त्यांचे कपडे परिधान करतात.

यावेळी मनीष मल्होत्राने दिवाळीनिमित्त दिलेल्या पार्टीत सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, कियारा अडवाणी, रेखा, सोनम कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावल्याचे दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

SCROLL FOR NEXT