Farah khan and Sonu Sood Instagram/@farahkhankunder
मनोरंजन

'तुम तो ठहरे परदेसीचा' होणार रिमेक ? फराह खान आणि सोनू सूद एकत्र

फराहने (Farah Khan) सोनूबरोबरचा (Sonu sood) एक फोटो शेअर केला असुन या फोटोला एक भन्नाट कॅप्शन दिले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे. बॉलिवूड दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक फराह खानने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार ‘सोनू सूद पुन्हा एकदा फराह खानसोबत काम करताना दिसणार आहे. या पुर्वी त्यांनी 'हॅप्पी न्यू इयर' चित्रपटात काम केले होते. (Farah Khan and Sonu Sood have teamed up for a remake of the tum to thehre pardesi song)

फराह खानने सोनू सुद सोबतचा फोटो केला शेअर

फराहने सोनूबरोबरचा एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघही ट्रॅक्टरवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत फराहने कॅप्शनमध्ये लिहिले "सगळ काही पंजाबी .. चंडीगड, ट्रॅक्टर आणि सोनू शुद .. आपल्या मित्राबरोबर शूट करायला नेहमीच खूप मजा येते"

सोनू सूद यांच्या वाढदिवशी होऊ शकते गाणे रिलीज

फराहच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की हे दोघेही एका म्युझिक व्हिडिओवर काम करत असुन चित्रीकरण पंजाबच्या चंदीगडमध्ये सुरू आहे. हे गाणे सोनू सूद यांच्या वाढदिवशी म्हणजेच 30 जुलै रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या गाण्याबाबत एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने म्हटले होते की, "माझ्या इतर गाण्यांपेक्षा किंवा चित्रपटातल्या अभिनयापेक्षा हे गाणं पूर्ण वेगळं आहे. फराहबरोबर काम करायला मला नेहमीच छान वाटतं."

अल्ताफ राजाच्या प्रसिद्ध "तुम तो ठैरे परदेसी"चा रीमेक ?

सोनू सूद करत असलेलं हे गाणं अल्ताफ राजाच्या लोकप्रिय ट्रॅक "तुम तो थेहरे परदेसी" चा रिमेक आहे, ज्याला टोनी कक्कर आणि अल्ताफ राजा पुन्हा तयार करतील. गाण्याच्या व्हिडिओमध्ये सोनू सूद एक शेतकरी म्हणून दिसणार आहे, तर या गाण्यात एक सुंदर प्रेमकथा सुद्धा पहायला मिळणार अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT