Bollywood actress Esha deol Dainik Gomantak
मनोरंजन

Esha Deol: अखेर निर्णय घेतलाच! 11 वर्षानंतर ईशा देओल होणार पतीपासून वेगळी?

Esha Deol: गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ईशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते आणि तिच्या पतीवरील प्रेमही व्यक्त केले होते.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मग त्यांचे चित्रपट असो किंवा त्यांचे वैयक्तिक आयुष्य, कधीकधी हे कलाकार त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल ही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताला या जोडप्याने दुजोरा दिला आहे. आतापर्यंत दोघे वेगळे होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता. लग्नाच्या जवळपास 11 वर्षानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ईशा देओल आणि भरत यांनी दिल्ली टाइम्सला जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली आहे. या निवेदनात 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील हा बदल आपल्या आणि आपल्या मुलांच्या दोघांच्या हिताचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.' त्यांनी म्हटले आहे.

ईशाने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानीशी लग्न केले. या दोघांचे लग्न मुंबईच्या इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने पार होते. 2017 मध्ये त्यांना राध्या ही मुलगी झाली आणि 2019 मध्ये ते पुन्हा आई-वडील झाले. ईशाने 2019 मध्ये दुसरी मुलगी मिरायाला जन्म दिला.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचे वैवाहिक आयुष्य सुरळित चालू नसल्याचे बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ईशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते आणि तिच्या पतीवरील प्रेमही व्यक्त केले होते. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला भरत उपस्थित नव्हता किंवा ईशाच्या वाढदिवसालाही तो उपस्थित नव्हता तेव्हापासून त्यांच्या नात्यातील मतभेदाच्या अफवा सुरू झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT