Entertainment: UAE based company charge cheating case against 83 movie producer  Dainik Gomantak
मनोरंजन

रणवीरचा '83' अडचणीत, निर्मात्यांविरुद्ध फसवणुकीची तक्रार

दैनिक गोमन्तक

संयुक्त अरब अमिराती (UAE) स्थित एका फायनान्सर कंपनीने येथील दंडाधिकारी न्यायालयात बॉलीवूड (Bollywood) चित्रपट '83' च्या निर्मात्यांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. फ्युचर रिसोर्सेस एफझेडईने अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली आहे. तक्रारदाराने चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत कट रचून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420 आणि 120बी अंतर्गत चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.तक्रारीत विब्री मीडिया आणि त्याच्या संचालकाच्या नावाचा समावेश आहे. वकील रिजवान सिद्दीकी यांनी सादर केले की आरोपीने '83' चित्रपटाची निर्मिती केली होती आणि फिर्यादीने म्हटले आहे की चित्रपटाच्या हक्कांसाठी आपली फसवणूक झाली आहे.(Entertainment: UAE based company charge cheating case against 83 movie producer)

तक्रारीनुसार, फ्युचर रिसोर्सेस FZE चे प्रतिनिधी मोठ्या गुंतवणुकीच्या शोधात असताना Vibree Media ला भेटले. तक्रारीत विब्री मीडियाच्या संचालकांवर बेकायदेशीरपणे बनावट आश्वासने दिल्याचा आणि एफझेडईला विब्रीसोबत 159 कोटी रुपये खर्च करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.आणि आता या प्रकरणाची चोकशी होणार आहे.

रणवीर सिंगच्या '83' चित्रपटातील पहिले गाणे 'लेहरा दो' काही दिवसापूर्वीच रिलीज झाले होते. हे गाणे देशभक्तीने भरलेले आहे. दोन मिनिटे 8 सेकंदाच्या या गाण्याच्या सुरूवातीला 1983 च्या विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत इंडियाला पराभवाला कसे सामोरे जावे लागल्याचे दाखवण्यात आले होते.तर काही दिवसांपूर्वीच 83 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. कपिल म्हणजेच रणवीर सिंगच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण पाहुण्यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 83 च्या विश्वचषकावर आधारित आहे जेव्हा भारताने माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. दीपिका या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT