Beautiful Actresses Over 40 Dainik Gomantak
मनोरंजन

Beautiful Actresses Over 40 : बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्री करतात आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य

वय आणि सौंदर्य यामधील समीकरण योग्य साधता आलेल्या चाळीशीनंतरही अप्रतिम दिसणाऱ्या अभिनेत्री आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री आणि रसिकांचे विशेष असे नाते आहे. अनेक अभिनेत्री त्यांच्या सुंदरतेमुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य करतात. वय आणि सौंदर्य यामधील समीकरण योग्य साधता आलेल्या चाळीशीनंतरही अप्रतिम दिसणाऱ्या अभिनेत्री आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.

या अभिनेत्रींनी हे सिद्ध केले आहे की वय फक्त एक संख्या आहे.

1. मलायका अरोरा

मलायका अनेक कारणांमुळे या सुंदर अभिनेत्रींच्या यादीत शीर्षस्थानी आहे. हॉट, आत्मविश्वासपूर्ण आणि मजबूत, शारीरिक आणि मानसिक दोन्हीदृष्ट्या, ही सुपर-फिट ममी याचा पुरावा आहे की एखाद्याला सामाजिक धारणांपुढे झुकण्याची गरज नाही आणि आपल्याला हवे ते आपण करू शकतो.

(Beautiful Actresses Over 40)

Malaika Arora

2. करिश्मा कपूर

अभिनेत्री करिश्मा कपूर ही कदाचित सर्वात नैसर्गिक आणि सुंदर चेहऱ्यांपैकी एक आहे जिने बॉलीवूडला शोभा दिली आहे. करिश्मा कपूर आजही तिच्या सहज सौंदर्याने ‘धडके दिल बार बार’ असे प्रेक्षकांचे मन हेलावते.

karishma kapoor

3. शिल्पा शेट्टी

फक्त एक ओळ आपल्याला या सुंदर अभिनेत्रीची ओळख करून देते,आणि ती म्हणजे, चुरा के दिल मेरा, गोरिया चली. अगदी आजही शिल्पा शेट्टी सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सुपर फिट आणि निरोगी राहण्याचे धडेही ती सर्वांना देत असते.

Shilpa Shetty Birthday

4. उर्मिला मातोंडकर

90 च्या दशकातील केवळ तिच्या आश्चर्यकारक हास्याने लोकांना घायाळ करणारी चुनचुनीत अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. तिच्या कमालीच्या चमकदार कामगिरीने, विशेषत: प्यार तुने क्या किया, भूत आणि एक हसीना थी यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपली जादू दाखवली आहेच सोबतच आपल्या सुंदरतेमुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

Urmila Matondkar

5. ऐश्वर्या राय

अभिनेत्री ऐश्वर्या राय 'जगातील सर्वात सुंदर महिला' म्हणून ओळखली जाते. ती तिच्या कामाने आणि तिच्या मोहकतेने जगभरातील महिलांना प्रेरणा देत आहे. फक्त पुरुषांच्याच नव्हे तर संगळ्यांच्याच मनात ऐश्वर्याची जागा अबाधित आहे.

aishwarya rai bachchan

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT