Emraan Hashmi Dainik Gomantak
मनोरंजन

Emran Hashmi: इमरान हाश्मीच्या चित्रपटात मौनी रॉयला पाहून नेटकऱ्यांना पडला 'हा' प्रश्न

Emran Hashmi: हा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मिडियावर नेटकरी अनेक कंमेट करताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

Emran Hashmi: सध्या अनेक चित्रपट, वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक चित्रपटांचे ट्रेलरही रिलिज झाले आहेत. आता बॉलीवूड अभिनेता आणि निर्माता इमरान हाश्मीची आगामी वेब सीरीज शोटाइम चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मिडियावर नेटकरी अनेक कंमेट करताना दिसत आहेत.

इमरान हाश्मीच्या आगामी वेब सीरिज 'शोटाइम'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी सलमान खानच्या 'टायगर' या चित्रपटात खलनायकाच्या जबरदस्त भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक झाले आहे. आता इम्रान त्याच्या वेब सीरिजसह ओटीटीवर धमाका करण्यास सज्ज आहे. या वेब सीरिजमध्ये इम्रान व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना आणि मौनी रॉय देखील दिसणार आहेत.

या मालिकेत फिल्मी दुनियेतील पडद्यामागे दडलेली काळी गुपिते उलगडणार असल्याचे 'शोटाईम'च्या या ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने या मालिकेसाठी चित्रपट निर्माता करण जोहरशी हातमिळवणी केली आहे.

'शोटाइम' या मालिकेत इमरान हाश्मी चित्रपट निर्माता म्हणून दिसत आहे. या ट्रेलरवर सोशल मिडियावर लोकांच्या कमेंट्स सातत्याने येत आहेत. ज्या व्यक्तिरेखेने लोकांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मौनी रॉय. काही लोक म्हणाले- मौनीला इतका कमी वेळ का स्क्रीनटाइम दिले आहे. मौनीच्या भूमिकेचे आणि तिच्या अभिनयाचे चाहते कौतुक रताना दिसत आहेत.

या मालिकेत महिमा मकवाना एका नव्या भूमिकेत दिसत असून इमरानचे तिच्याशी असलेले मतभेद स्पष्टपणे दिसत आहेत. ती इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करत आहे, पण इंडस्ट्रीवर दीर्घकाळ राज्य करणारा इमरान हाश्मी तिच्या मार्गात येतो. ट्रेलरमध्ये तो घराणेशाहीवर भाष्य करताना दिसतो आणि म्हणतो – प्रत्येक बाहेरच्या व्यक्तीला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये इनसाइडर बनायचे आहे.

ट्रेलरमध्ये नसीरुद्दीन शाह 'सिनेमा हा व्यवसाय नसून धर्म आहे' असे म्हणताना दिसत आहे. या 2 मिनिट 4 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय सुरु असते यावर या चित्रपटाची असलेली कथा दिसत आहे. हे डिस्ने प्लस हॉटस्टार वर 8 मार्च 2024 रोजी रिलीज होत आहे.

दरम्यान, आता प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार का, मौनीची काय भूमिका आहे आणि किती वेळासाठी हे चित्रपट पाहिल्यानंतर समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT