Emraan Hashmi Dainik Gomantak
मनोरंजन

Emraan Hashmi: 'टायगर 3' नंतर इमरान हाश्मी दिसणार करण जोहरसोबत?

Emraan Hashmi: करण जोहरच्या शोबद्दल बोलायचे झाले तर त्याची घोषणा 2022 मध्ये झाली होती.

दैनिक गोमन्तक

Emraan Hashmi: बॉलीवूडचे सितारे नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात. आता इमरान हाश्मी टायगर ३ मुळे चर्चेत आला आहे.

टायगर म्हणजेच सलमान खान आणि झोया म्हणजेच कतरिना कैफच्या 'टायगर 3'मधील दमदार अभिनयानंतर इमरान हाश्मीने अखेर पुनरागमन केल्याचे दिसत आहे. आता इम्रान एका शोमध्ये दिसणार आहे.

तोही करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनत असलेल्या ओटीटी शो 'शोटाइम'मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. असा दावा केला जात आहे की हा शो बॉलीवूडची अनेक गूढ रहस्ये उघड करणार असल्याचे म्हटले जात आहे.

इम्रानचा हा पहिला ओटीटी प्रकल्प नाही. 'बार्ड ऑफ ब्लड' (2019) या वेब शोमध्ये शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊससोबत पहिल्यांदा काम केले. जे त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित होते, परंतु शोचा दुसरा सीझन कधीच आला नाही.

इम्रान म्हणाला, 'प्रत्येकजण माझ्याकडे येतो आणि मला विचारतो की तू शोचा दुसरा सीझन का करत नाहीस? गोष्ट अशी आहे की हा शो पुस्तकावर आधारित होता आणि आम्ही दुसऱ्या सीझनसाठी योग्य कथा तयार करू शकलो नाही.

करण जोहरच्या शोबद्दल बोलायचे झाले तर त्याची घोषणा 2022 मध्ये झाली होती. या शोमध्ये करण हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गुपिते उघड करताना दिसणार आहे. हे कधी सुरू होणार याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT