Bollywood actress Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

जॅकलिन फर्नांडिसला ईडीने पुन्हा समन्स बजावले

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी वाढत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी वाढत आहेत. काल तिला भारतातून बाहेर पडताना मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. ईडीने तिच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. असे असूनही ती भारताबाहेर जात होती. आता बातम्या येत आहेत की जॅकलीन 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकताना दिसत आहे. अभिनेत्रीला ईडीने (ED) पुन्हा समन्स बजावले असून तिला 8 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे, ज्यामध्ये जॅकलिनचे नावही समोर आले आहे.

अलीकडे सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekar) आणि जॅकलिनचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दोघांची जवळीक दाखवण्यासाठी हे फोटो पुरेसे होते. सुकेश जॅकलिनला अनेकदा भेटला होता आणि त्याने जॅकलीनला महागड्या भेटवस्तूही दिल्या होत्या. अनेक रिपोर्ट्समधून या गोष्टी समोर आल्या आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावाही अनेक ठिकाणी केला जात आहे. तिच्या आणि सुकेशच्या जवळीकीने तिला या प्रकरणात गोवले आहे. ईडीने न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले असून त्यात अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

या अहवालात त्या सर्व भेटवस्तू आणि त्यांची किंमत नमूद करण्यात आली असून सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे सांगण्यात आले आहे. भेटवस्तूमध्ये 9 लाख किमतीची पर्शियन मांजर आणि 52 लाख किमतीचा घोडा देखील दिला आहे. एवढच नाही तर नोरा फतेहीवर देखील त्याने खूप पैसा खर्च केला होता. नोराला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन दिला होता. ईडीने कोर्टात आरोपपत्र सादर करताना ही माहिती दिली. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे.

चित्रपट कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो

सूत्रांच्या हवाल्याने, काल ईडीने जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केल्याचे वृत्त आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. ज्यामध्ये त्याचे नाव ठग सुकेश चंद्रशेखरसोबत जोडले जात आहे. जॅकलिनला आता भारताबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे तिच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम तिच्या चित्रपटांच्या शूटिंगवरही होणार आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, तोपर्यंत जॅकलीनवर असे निर्बंध राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT