Dunki trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Dunki Trailer: डंकीचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Dunki Trailer: आता पठाण आणि जवान प्रमाणेच डंकी देखील बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

Dunki Trailer: शाहरुख खान सध्या आपल्या नवनवीन आणि जबरदस्त चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पठाण आणि जवाननंतर आता त्याचा या वर्षातील तिसरा मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक मोठ्या आतुरतेने डंकीची वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

ट्रेनमधील दृश्यांपासून शाहरुखची पहिली झलक तुम्हाला त्याच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाची आठवण करून देते. चित्रपटाला एक उत्तम ओपनिंग आहे जी येणार्‍या उत्साहाचा टोन सेट करते. 3 मिनिट 21 सेकंदाचा व्हिडिओ हार्डी उर्फ ​​शाहरुख खानपासून सुरू होणार्‍या चमकदार आणि हृदयस्पर्शी पात्रांची ओळख करून देतो.

तो पंजाबमधील लल्टू या सुंदर गावात पोहोचतो आणि मनू, सुखी, बग्गू आणि बल्ली यांसारख्या काही मित्रांना भेटतो. त्या सर्वांचे एकच स्वप्न आहे, लंडनला जाण्याचे, चांगल्या संधींच्या शोधात आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले जीवन देण्यासाठी त्यांना लंडनला जायचे आहे. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. 

आता २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रस्तुत 'डिंकी'ची अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. आता पठाण आणि जवान प्रमाणेच डंकी देखील बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT