Akshay Kumar
Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar: मी जेवढं कमावतो तेवढा कर...' आपल्या कमाईबद्दल बोलला बॉलीवूडचा खिलाडी

दैनिक गोमन्तक

Akshay Kumar: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आता एका मुलाखतीत त्याने आपल्या व्यक्तीगत आणि व्यावसायिक जीवनाबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत.

मी कधीच विचार केला नव्हता की मी इतके पैसै कमाऊ शकेन, गाडी घेईन, स्वत:चे घर घेईन. आज माझ्याकडे सगळे आहे आणि मी नेहमी हा विचार करतो की जर मी कोणाला मदत करण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी योग्य असेन तर मी नेहमीच त्यासाठी तयार आहे.

आत्ता त्यावर जास्त काही बोलणार नाही असंही अक्षय कुमारने म्हटले आहे. अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वांत जास्त व्यस्त असणारा अभिनेता मानला जातो.

आपल्या कमाईबद्दल बोलताना अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी जेवढं कमावतो तेवढा करही भरतो. संपूर्ण करिअरमध्ये अक्षय कुमारने 2500 ते 3000 करोड रुपयांची कमाई केली आहे.

मागच्या काही वर्षातील अक्षय कुमारच्या कमाईचे आकडे बघता 2020 मध्ये अक्षयने 356 करोड रुपए , 2019 मध्ये 532 करोड रुपए, 2018 मध्ये 331 करोड रुपए अशी गेल्या काही वर्षात कमाई केलेली दिसून येते.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने गेल्या पाच वर्षात 625 करोड रुपयांचा टॅक्स भरला आहे. याबरोबरच, सर्विस टॅक्स आणि जीएसटी मिळून 200 करोड रुपए टॅक्स भरला आहे. म्हणजेच अक्षय कुमारने गेल्या पाच वर्षात 825 करोड रुपए टॅक्स भरला आहे.

दरम्यान, आपल्या जेवणाबद्दल अक्षयने म्हटलंय की मी माझ्या गरजेपुरतेच खातो. मी कुठेतरी वाचले होते की आपल्या तळहातात जेव्हढे बसेल तेवढेच खावे त्यामुळे मी कमीच खातो. मी पैशांच्या मागे धावत नाही. मी माझ्या कुटुंबासोबत वेळही घालवतो, असंही अक्षय कुमार( Akshay Kumar )ने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT