Sajid Khan Rayya Labib Dainik Gomantak
मनोरंजन

Sajid Khan: दिग्दर्शक साजिद खानवर आता 'या' अभिनेत्रीने केला छेडछाडीचा आरोप

Akshay Nirmale

Sajid Khan: चित्रपट दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणीच कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे बिग बॉस या रिलॅलिटी शोमधील त्याच्या खेळामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर घराबाहेरही त्याच्यावर सतत मीटू प्रकरणात आरोप केले जात आहेत. याच क्रमात आता मुंबईच्या एका मॉडेल-अभिनेत्रीने साजिदवर छेडछाडीचा आरोप केला आहे.

राया लबीब असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती साजिद खानला मुंबईतील वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका पार्टीत भेटली होती. जिथे एका कास्टिंग डायरेक्टरने तिची साजिदशी ओळख करून दिली.

रैया लबीब हिने साजिदवर छेडछाडीचा आरोप केला आहे. ही घटना 10 वर्षांपूर्वीची आहे, असे रैया हीने म्हटले आहे. या भेटीदरम्यान साजिदने तिच्या स्तनांच्या आकारावर टिप्पणी केली होती. आठवड्यातून किती वेळा शारिरीक संबंध ठेवतेस, असेही साजिदने विचारल्याचे रैया हीने म्हटले आहे. त्याने मला लग्नासाठी तीन वेळा विचारले होते. स्तनांच्या सर्जरीसाठी त्याने मला मुंबईतील एका प्रसिद्ध कॉस्मेटिक सर्जनचे नावही सुचवले होते. मी तेव्हा फक्त 18 वर्षांची होते.

रैया म्हणाली, तो माझा स्ट्रगलचा काळ होता. त्या काळात मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत होते. जे काही प्रोजेक्ट मिळतील ते करत होते. इथे प्रत्येकाला या टप्प्यातून जावे लागते. मी साजिदच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. अनेक दिग्दर्शक माझ्याशी अशाच पद्धतीने बोलले आहेत. मला त्याची सवय झाली आहे. मी आसामची आहे, त्यामुळे पंजाबी किंवा उत्तरेच्या तुलनेत माझी शारीरिक ठेवण वेगळी आहे. बिग बॉसमध्ये साजिद खानला पाहून मला 10 वर्षांपूर्वीची ही घटना आठवली आणि मी ती मीडियासोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री रैया लबीब ही दिग्दर्शक मनीष एफ. सिंग यांच्या ग्रीन टेरर चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट पाक पुरस्कृत दहशतवादावर आधारित होता. याशिवाय ती वेलकम टू चेन्नई या चित्रपटातही दिसली आहे. रैया लवकरच OTT वर तंदूरी भाभी या अॅडल्ट कॉमेडी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT